Festival Posters

Ganesh Chaturthi 2022: गणपतीची सर्वात प्रसिद्ध मंदिरे, या चतुर्थी नक्कीच भेट द्या

Webdunia
मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:32 IST)
गणेश चतुर्थी 2022:  गौरीपुत्र भगवान गणेश हा इच्छा पूर्ण करणारा देव मानला जातो. हिंदू धर्मानुसार गणपती हा सर्व देवतांमध्ये पूजनीय आहे. हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. कोणत्याही सणाच्या किंवा पूजेच्या वेळी गणपतीबाप्पाचे स्मरण प्रथम केले जात असले तरी भाद्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. हा सण 10 दिवसांचा असतो, ज्यामध्ये लोक उपवास करतात आणि गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेतात. गणपती उत्सवानिमित्त एखाद्या गणेश मंदिराला भेट द्यायची असेल, तर भारतात अनेक गणपती मंदिरे आहेत. चला तर मग या मंदिर बद्दल जाणून घेऊ या.
 
1 सिद्धिविनायक मंदिर मुंबई -
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबई, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेश मंदिरांपैकी एक आहे. सिद्धिविनायक मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. गणपतीचे हे प्राचीन मंदिर 1801 मध्ये बांधले गेले. असे मानले जाते की जो कोणी मनापासून या मंदिराचे दर्शन घेतात  त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हा गणपती नवसाला पावणारा आहे .सेलिब्रिटी आणि राजकारणी अनेकदा या मंदिराला भेट देतात.
 
2 अष्टविनायक मंदिर महाराष्ट्र - अष्टविनायक हे म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. याला गणपतीची आठ तीर्थे म्हणतात आणि आठ मंदिरांपैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहेत. ज्या प्रमाणे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील अष्टविनायकाची आठ पवित्र मंदिरे आहेत. या मंदिरांना पौराणिक महत्त्व आणि इतिहास आहे. श्रीगणेशाच्या मूर्ती स्वयंभू आहे. गणेश आणि मुद्गल पुराणात या सर्व मंदिरांचा उल्लेख केला आहे. ही मंदिरे आहेत- 1 मयूरेश्वर, किंवा मोरेश्वर मंदिर पुणे, 2 सिद्धिविनायक मंदिर अहमदनगर, 3 बल्लाळेश्वर मंदिर रायगड, 4 वरदविनायक  मंदिर रायगड, 5 चिंतामणी मंदिर पुणे,6 गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर पुणे,7 विधेश्वर अष्टविनायक मंदिर ओझर, 8 महागणपती मंदिर रांजणगाव.
 
3 खजराना गणेश मंदिर, इंदूर -
खजराना गणेश मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंदिरांमध्ये खजराना मंदिराचे नाव समाविष्ट आहे. येथे भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे येतात आणि गणेशमूर्तीच्या पाठीवर उलटे स्वस्तिक बनवतात आणि भोग अर्पण करून देवाची कृतज्ञता व्यक्त करतात. या मंदिरात गणेशाची तीन फूट उंचीची मूर्ती असून ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे.
 
4 रणथंबोर गणेश मंदिर, राजस्थान -
राजस्थानच्या रणथंबोरमध्ये बांधलेले हे गणेश मंदिर केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले गणेश मंदिर मानले जाते. या मंदिरात गणेशाची त्रिनेत्री मूर्ती आहे. ही प्रतिमा स्वतः पृथ्वीवर प्रकट होते. 1000 वर्षांहून अधिक जुने हे मंदिर रणथंबोर किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाणी बांधले आहे. विशेष बाब म्हणजे हे गणेश मंदिर राजस्थानमधील पहिले आहे, जिथे गणपतीचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे. या मंदिरात गणेशजींची पत्नी रिद्धी आणि सिद्धी आणि दोन मुले शुभ-लाभ देखील आहेत.
 
5 डोडा गणपती मंदिर, बंगळुरू-
दक्षिण भारतातील सर्वात आश्चर्यकारक मंदिरांपैकी एक म्हणजे गणेशाचे डोडा गणपती मंदिर. डोडा म्हणजे मोठा. त्याच्या नावाप्रमाणेच, बंगळूरमध्ये असलेल्या या मंदिरात 18 फूट उंच आणि 16 फूट रुंद गणेशाची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एकाच खडकावर कोरण्यात आली आहे
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनिवारची आरती

Margashirsha Guruvar 2025 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? पूजा पद्धत, आरती आणि कथा संपूर्ण माहिती जाणून घ्या

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

आरती शुक्रवारची

श्री दत्ताची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

पुढील लेख
Show comments