Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

संजय राऊत झुकत नाहीत, म्हणून कुटुंबाला धमक्या !

sanjay raut
, शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (08:12 IST)
गोवा विधानसभा  निवडणुकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या गोव्यात आहेत. अशावेळी भाजप नेते आणि माजी खा. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात ईडीने राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही छापा टाकलाय. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी राऊतांना थेट इशारा दिला आहे. सोमय्यांच्या या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार असल्याचं वक्तव्य केलंय.
 
अनेक वर्षापासून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिलो जातोय. माझे नातेवाईक, माझा मित्र परिवार, माझे सहकारी यांना केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे त्रास दिला जातोय. पण त्याची पर्वा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुगांत जायला आणि मरायलाही तयार आहे. मी काळजी करत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसंच सुजित पाटकर हे माझे नातेवाईक आहेत. तुम्ही कोण आहात? बघून घेऊ आम्ही. अत्यंत खालच्या स्तरावरील राजकारण सुरु आहे. संजय राऊत झुकत नाहीत, वाकत नाहीत, मग कुटुंबाला धमक्या द्यायच्या, बदनामी करायची, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणायचा. पण करु द्या, २०२४ पर्यंत हे चालेल, २०२४ नंतर पत्ते उलटे पडलेले असतील, असा दावाही संजय राऊत यांनी केलाय.
 
किरीट सोमय्यांचा थेट इशारा
सुजित पाटकर आणि तुमचा संबंध काय? उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे उद्योगधंदे मान्य करा, अन्यथा उद्या चार वाजता पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत, सुजित पाटकर, प्रवीण राऊत हे तिघे मिळून काय काय उद्योगधंदे करतात, ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर किरीट सोमय्या हळूहळू टप्प्याटप्प्याने मांडत आहे. उद्या संजय राऊत यांच्या अजून एका उद्योगधंद्याचा पर्दाफाश पुण्यात होणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोवा निवडणूक : भाजपला मनोहर पर्रिकरांची उणीव नेहमी भासेल – फडणवीस