हिंदू धर्मात भगवान विष्णूला अनन्यसाधारण महत्व आहे. शांती, समृद्धी, सुख मिळवण्यासाठी विष्णूची पूजा केली जाते. विष्णू हे ब्रम्हा-विष्णू-महेश या त्रिदेवांपैकी एक आहेत. ब्रम्हाने ब्रम्हांडाची निर्मिती केल्यानंतर विष्णूवर ब्रम्हांडाचे रक्षण करण्याचे काम सोपवले.
समुद्रात वास्तव्य करणारया विष्णूचे गरूड हे वाहन आहे. लक्ष्मी ही त्याची पत्नी. नारद मुनी त्यांचा मानसपुत्र. चार हात असणारया विष्णूच्या एका हातात शंख, दुसरया हातात सुदर्शन चक्र, तिसरया हातात कमळ तर चौथ्या हातात गदा असते.
असूरांचा नाश करण्यासाठी विष्णूने मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण हे अवतार घेतले. तर दहावा अवतार कलकीच्या रूपात असेल, असे मानले जाते.
About Writter
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा