अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने मोठा डाव खेळला आहे. राज्यातील भाजप सरकारने शनिवारी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याचे मानले जात आहे कारण पुढील आठवड्यात राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की, या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील आणि तीन ते चार सदस्य असतील.
यापूर्वी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारांनी आपापल्या राज्यात यूसीसी लागू करण्याची घोषणा केली होती.