Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते

कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते
, गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (17:54 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. गुजरातच्या निकालांवर ते म्हणतात, “सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे- तुम्ही सगळे चॅम्पियन आहात. या कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हते.
 
हे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद आहेत.
 
हिमाचलच्या निकालांवर ते म्हणतात, “भाजपबदद्ल जे प्रेम हिमाचल प्रदेशच्या लोकांनी दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात राज्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”

गुजरातच्या विजयाबदद्ल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे. ‘गुजरातचा विजय ऐतिहासिक आणि विक्रमी आहे. मी भाजप आणि मोदींचं अभिनंदन करतो.” असं ते म्हणाले.
 
तर हिमाचल प्रदेशच्या विजयाबद्दल काँग्रेसला आणि दिल्ली मनपात विजय मिळवल्याबद्दल त्यांनी आप चं ही अभिनंदन केलं आहे.
 
“गुजरातचा निकाल अपेक्षितच होता.गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यामुळे जनतेने भाजपला भरघोस मतदान केलं. या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले उद्योगही फळले असावेत.” असा टोलाही हाणला.
 
आपने गुजरातमध्ये मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हेही स्पष्ट झाले, असो ज्याचं त्याचं राजकारण सोयीनुसार चालत असतं असंही ते पुढे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुजरातचा विजय ऐतिहासिक, मोदी आणि भाजपचं अभिनंदन- उद्धव ठाकरे