साहित्य : 500 ग्रॅम मक्याचा आटा, 100 ग्रॅम तांदुळाची पिठी, ओवा, जिरं पूड, तिखट, धने पूड 1 चमचा, हिंग, मीठ अंदाजे, हिरवी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 कप तेल.
कृती : तांदूळ व मक्याच्या पिठाला एकत्र करून चाळून घ्यावे व त्यात सर्व मसाले टाकावे. नंतर पिठात पाणी घालून, पीठ मळून घ्यावे व तव्यावर तेल घालून ठेपले लावावे. वर झाकण ठेवावे. ठेपले मंद भाजावे. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा