Festival Posters

मटार ढोकळा

Webdunia
साहित्य : अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी तांदूळ, 1 वाटी वाफवलेले मटार, 2 पालकाची पाने, 4 पानं कढीपत्ता, अर्धा इंच आलचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ, चिमूटभर खाण्याचा सोडा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचा तीळ. सजावटीसाठी 1 चमचा कोथिंबीर, 1 चमचा ताजं खोबरं.
 
कृती : तांदूळ, चणाडाळ आणि उडीदडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्‍या   दिवशी निथळून मिक्सरला लावावे. त्यातच आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या, हिंग, पालक आणि मटार घालून मिक्सरला लावावे. आता बाऊलमध्ये काढून 7 ते 8 तास झाकून ठेवावे. नंतर त्यात मीठ, तेल, खाण्याचा सोडा आणि थोडेसे पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाप्राणे बनवावे. ढोकळा वाफवण्यासाठी इडली पात्राला तेलाचा हात लावावा. त्यात तयार ढोकळ्याचे मिश्रण चमच्याने घालून 15 मिनिटे वाफवावे. ढोकळा गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून ताटात काढाव्यात. पॅनमध्ये गरम तेलात मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता व तीळ टाकून तयार तडका ढोकळ्यावर पसरवावा. कोथिंबीर व खोबर्‍याच्या मिश्रणाने सजवून ढोकळा खाण्यास द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

Maharana Pratap Jayanti 2026 Speech महाराणा प्रताप यांच्यावर भाषण

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर किती दिवस सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Mango Malpua Recipe मालपुआला द्या आंब्याचा ट्विस्ट; एक अप्रतिम चव

रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या

AIIMS Vacancy : एम्स सीआरई-५ भरती दहावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात

पुढील लेख
Show comments