Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Chandra Grahan 2020: सलग तिसऱ्या वर्षी गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण, कुठे दिसणार हे ग्रहण आणि सुतक काळ

Chandra Grahan 2020: सलग तिसऱ्या वर्षी गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण, कुठे दिसणार हे ग्रहण आणि सुतक काळ
, गुरूवार, 2 जुलै 2020 (06:27 IST)
आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण लागणार आहे. 5 जुलै रोजी गुरु पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र होणार. हे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा गुरु पौर्णिमेला चंद्र ग्रहण असणार. 
 
देशात गुरु पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 5 जुलै रोजी लागणारे हे चंद्र ग्रहण छाया चंद्रग्रहण असणार आहे. छाया चंद्रग्रहणात चंद्रावर फक्त पृथ्वीची सावलीच पडणार आहे. म्हणून हे ग्रहण नसणार. त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव आणि सुतक काळ मान्य नसणार.
 
कुठे-कुठे दिसणार चंद्रग्रहण
5 जुलै रोजी असणारे हे चंद्रग्रहण छाया चंद्र ग्रहण असणार जे अमेरिका, युरोप आणि आस्ट्रेलिया येथे बघता येईल. हे चंद्र ग्रहण यंदा धनू रासमध्ये लागणार आहे. या व्यतिरिक्त सूर्य मिथुन रासमध्ये असणार. 
 
चंद्र ग्रहण आणि गुरु पौर्णिमा 
गुरु पौर्णिमेची तिथी 4 जुलै 2020 रोजी दुपारी 11 वाजून 33 मिनिटा पासून सुरू होणार जी 5 जुलै रोजी 10 वाजून 13 मिनिटा पर्यंत असणार. 
 
या पूर्वी वर्ष 2018 मध्ये 27 जुलै रोजी आणि वर्ष 2019 मध्ये 16 जुलै रोजी गुरु पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकत्र आले होते. यंदाच्या वर्षी 2020 मध्ये देखील 5 जुलै रोजी असाच योगायोग होणार आहे.
 
कधी होतं चंद्र ग्रहण
जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्र ग्रहण असत. चंद्र ग्रहणाच्या दरम्यान सूर्य, पृथ्वी आणि चंद्रमा तिन्ही एका रेषेत येतात.
 
5 जुलै रोजी छाया चंद्र ग्रहण 
5 जुलै रोजी असणारे चंद्रग्रहण छाया चंद्र ग्रहण असे म्हटले जाणार. जेव्हा सूर्य आणि चंद्रमाच्या मध्ये पृथ्वी अश्या स्थिती मध्ये येते की हे तिन्ही एका सरळ रेषेत नसून अशी स्थिती बनवतात की जेथून पृथ्वीची किंचित सावलीच चंद्रावर पडते यालाच छाया चंद्रग्रहण म्हणतात. या पूर्वी 5 जून रोजी देखील असेच चंद्रग्रहण झाले होते. 
 
सुतक 
छाया चंद्रग्रहणाच्या मुळे ह्याचे सुतक काळ वैध नसणार. या व्यतिरिक्त या ग्रहणाचा कोणताही प्रभाव नसणार. चंद्रग्रहण दरम्यान सुतक काळ 9 तास पूर्वी पासून लागतं तर सूर्यग्रहणाच्या दरम्यान 12 तासा पूर्वीच सुतक काळ लागतो. सुतक काळ लागल्यावर पूजा पाठ केली जात नाही. 
 
गुरु पौर्णिमेला काय करावे
5 जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुची पूजा करावी. हिंदू कालदर्शिकेनुसार या दिवशी महाभारताचे निर्मिते लेखक महर्षी वेदव्यास यांची जयंती देखील साजरी करतात. पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा आणि त्यांची पूजा करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरु पूजनासाठी हे 4 सोपे मंत्र श्रेष्ठ