Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Guru Purnima 2022 यंदा गुरुपौर्णिमा महत्त्वाची का, जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Guru Purnima 2022 यंदा गुरुपौर्णिमा महत्त्वाची का, जाणून घ्या कारण आणि महत्त्व
, बुधवार, 29 जून 2022 (12:05 IST)
Guru Purnima 2022 Date: गुरुंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी गुरुपौर्णिमा हा सण बुधवार, 13 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. गुरु पौर्णिमा 2022 ही व्यास जयंती म्हणूनही साजरी केली जाते. या संपूर्ण सृष्टीत गुरुंचे स्थान सर्वात मोठे आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नाही. कोणत्याही दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून, तुमच्या शिक्षकांकडून आशीर्वाद मिळू शकतात. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी (Guru Purnima 2022) गुरूंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केल्यास तुमचे जीवन आनंदी होते. ज्ञानाचे डोळे उघडणाऱ्या गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी 2022 च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची विधिवत पूजा करावी.
 
यंदा गुरु पौर्णिमा (Guru Purnima 2022) अती महत्त्वाची
या वेळी, बुधवार, 13 जुलै रोजी येणारी गुरु पौर्णिमा 2022 खूप महत्त्वाची आहे. कारण यावेळी अनेक राजयोग तयार होत आहेत. यावेळी रुचक, भद्रा, हंस आणि शश नावाचे चार राजयोग तयार होत आहेत. बुध ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे बुधादित्य योगही आहे. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आपल्या मित्र ग्रहासोबत बसले आहेत. हा काळही खूप लाभदायक आणि अनुकूल आहे. 2022 मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार झालेल्या विशेष योगामुळे या वेळी त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. यामध्ये घेतलेल्या गुरु दीक्षा किंवा गुरु मंत्राने जीवन यशस्वी होऊ शकते.
 
गुरु पौर्णिमा महत्व (importance of Guru Purnima)
गुरु पौर्णिमा (Guru Purnima 2022 ) च्या दिवशी गुरुची पूजा करणे आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याने मनुष्याला मानसिक कष्टांापसून मुक्ती मिळते. आत्मबळ वाढतं. सृष्टीत गुरुंचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. गुरुच्या आशीर्वादाविना देवांचा आशीर्वाद देखील अयशस्वी असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच गुरु पौर्णिमेला (Guru Purnima 2022) विधीपूर्वक गुरूंच्या चरणांची पूजा करून गुरूंचा आशीर्वाद घेतला पाहिजे. यामुळे मानवी मनातील शंका दूर होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आषाढी एकादशी माहिती मराठी