Festival Posters

Guru Purnima Wishes in Marathi गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी मध्ये

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (21:58 IST)
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. 
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. 
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. 
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. 
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी,
सकळ जना..
तो ची गुरू खरा,
आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
ALSO READ: Guru Purnima Quotes गुरू पौर्णिमा कोटस
गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, 
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, 
लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरुविण कोण दाखविल वाट 
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरू म्हणजे, तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
 
योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
आदी गुरूसी वंदावे |
मग साधनं साधावे ||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप ||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ आहे तया पाशी ||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरण त्याचे हृदयीं धरू ||
आजच्या दिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडुन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
 
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच चंद्र शोधा..
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा
एकच सूर्य जवळ ठेवा…
 
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा.
 
जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो,
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे.
ALSO READ: Guru Purnima 2022 गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या 5 मंत्रांचा जप करा
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. 
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. 
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. 
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. 
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. 
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, 
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला,
तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर
पुन्हा पुन्हा चालायला.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल,
लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आत्मा नाही.
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
माझ्या सर्व गुरूंना आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
 
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म ह्या सर्वच गुरुच्या देणंग्या आहेत
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Shri Guru Stotram श्री गुरु स्तोत्रम् (गुरु वंदनम्)

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

Vasudeva Chaturthi 2026 वासुदेव चतुर्थी व्रत तिथी, मंत्र, शुभ मुहूर्त आणि संपूर्ण पूजा-विधी

Lakshmi Panchami 2026 चैत्र नवरात्री लक्ष्मी पंचमी पूजन पद्धत आणि कथा

Adhik Maas 2026: यंदा कोणता महिना अधिक आहे? पुरुषोत्तम मास कधीपासून सुरू होतोय? सर्व काही सविस्तर जाणून घ्या

Matsya Jayanti 2026 मत्स्य जयंती 21 मार्च रोजी, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

पुढील लेख
Show comments