Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 28 May 2025
webdunia

महाभारतातील 15 मायावी योद्धा, त्यांची शक्ती जाणून व्हाल हैराण

warriors

अनिरुद्ध जोशी

, सोमवार, 20 एप्रिल 2020 (22:41 IST)
महाभारतात एकापेक्षा एक महायोधा होते. जे सामर्थ्यवान असूनही चमत्कारी होते. त्यांनी अनेक चमत्कारिक कार्ये केले होते. भगवान श्रीकृष्ण तर स्वतःच विष्णू अवतार होते पण त्यांच्या सामोरी येऊन लढा करणारे योद्धाही काही कमी नव्हते.
 
1 सहदेव : पांडुपुत्र सहदेवाला भावी प्रत्येक घटनेविषयी आगाऊ माहिती होती. त्यांना ठाऊक होते की महाभारत होणार आहे आणि कोण मरणार आणि कोण जिंकणार. पण भगवान श्रीकृष्णाने त्याला श्राप दिले होते की जर या संदर्भात कोणास सांगितले तर तू मरण पावशील.
 
2 बर्बरीक : बर्बरीक हा जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर होता. बर्बरीकसाठी तीन बाण पुरेसे असे. त्यांच्या बळावर ते कौरवांची आणि पांडवांची संपूर्ण सैन्याला नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवत असे. रणांगणावर भीमचा नातू बर्बरीकने दोन्ही शिबिरामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली उभारून मी पराभूत होणाऱ्याच्या बाजूने लढणार अशी घोषणा केली. पण श्रीकृष्णाने त्यालाही अद्दल घडविली.
 
3 संजय : महाभारताच्या युद्धाच्या वेळी संजय वेदादी शास्त्रात पारंगत होऊन धृतराष्ट्राचा राज्यसभेचे आदरणीय मंत्रिपद मिळविले. आजकालच्या दृष्टिकोनातून संजय टेलिपॅथी शिक्षणामध्ये पारंगत होते. अशी आख्यायिका आहे की महाभारतातील गीताची शिकवणी फक्त दोन लोकांनीच ऐकली होती. एक अर्जुन आणि दुसरे होते संजय.   
 
4 अश्वत्थामा : गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा प्रत्येक विषयामध्ये पारंगत असे. ते महाभारतातील युद्धाच्या पहिल्याच दिवशी युद्धाचा अंत करण्याचा सामर्थ्य ठेवत असे. पण श्रीकृष्णाने असे काहीही होऊ दिले नाही. कारण कृष्णाला हे ठाऊक होते की हे दोघे पिता-पुत्र दोघे मिळूनच युद्ध संपवू शकतात.
 
5 कर्ण : कर्णाकडून त्याचे कवच आणि कुंडल घेतले नसते तसेच कर्णाने इंद्राकडून मिळालेले अमोघ अस्त्राला भीमाच्या मुला घटोत्कचावर वापर न करता अर्जुनावर केला असता तर भारताचा इतिहास आणि धर्म वेगळेच असते. 
 
6 भीम : कुंती आणि पवनाचे मुलं भीम म्हणजेच पवनपुत्र भीम होते. भीमांमध्ये सहस्र हत्तीचे बळाचे सामर्थ्य होते. युद्धामध्ये त्यांच्या मुलगा घटोत्कच भीमापेक्षा जास्त सामर्थ्यवान होते. बर्बरीक हा घटोत्कचा मुलगा होता.
 
7 घटोत्कच : असे म्हटले जाते की उंची बांधाला बघितले तर भीमपुत्र घटोत्कच येवढा मोठा आणि सामर्थ्यवान असे की आपल्या लाथेने एका रथाला किती तरी पटीने मागे ढकलून देत असे. आणि सैन्याला आपल्या पायाखाली तुडवत असे. घटोत्कचाने भीमाच्या आसुरी बायको हिडिंबाच्या पोटी जन्म घेतले होते. 
 
8 भीष्म : शंतनू आणि गंगेच्या मुलाचे नांव देवव्रत होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान मिळाले होते. ते स्वर्गातील 8 वासूंमधील एक होते जे श्रापामुळे मानव कुटीत जन्मले होते.
 
9 दुर्योधन : दुर्योधनाचे शरीरं कडक लोखण्डी होते. त्याचा शरीराला कोणते ही शस्त्र भेदू शकत नसे, पण श्रीकृष्णाच्या छळ केल्यामुळे त्याची जांघ कमकुवत राहते. भीम युद्धामध्ये त्याचा जांघेवर वार करून त्याला ठार मारतो आणि त्याचा शरीराचे दोन भाग करतो. 
 
10 जरासंध : जरासंधाचे शरीराचे दोन भाग केल्यावर ते परत एक होऊन जायचे. भीम आणि जरासंधाच्या युद्धाच्या वेळेस श्रीकृष्णाने भीमाला खुणावून त्याच्या शरीराला फाडल्यावर वेगवेगळ्या दिशेमध्ये फेकायला सांगितले होते. 
 
11 अभिमन्यू : अभिमन्यूने आपल्या आईच्या पोटातच राहून संपूर्ण युद्धतंत्रांचे धडे घेतले होते. आईच्या पोटातच असताना त्याने चक्रव्यूह भेदण्याचे धडे घेतले पण त्याला चक्रव्यूह तोडावयाचे कसे हे शिकतातच आले नाही. कारण तो शिकत असताना त्याची आई सुभद्रा झोपी गेली होती. 
 
12 बलराम : बलराम सर्वात सामर्थ्यवान होते. ते महाभारताच्या युद्धामध्ये सामील झाले असते तर सैन्याची गरजच भासली नसती. खरं तर बलरामाचे नाते दोन्ही बाजूने जवळीक असे. त्यांना बालभद्र देखील म्हणत असे. अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी दुर्योधनाने श्रीकृष्णाच्या मुलाला सांबाला बंदी बनविले होते तेव्हा बलरामाने संतापून हस्तिनापूरच्या जमिनीला आपल्या नांगराने जोरात हादरून टाकले आणि चेतावणी दिली की जर त्यांनी तडजोड केली नाही तर हे संपूर्ण शहराचे नायनाट करण्यात येईल. बलरामाच्या या रूपाला दुर्योधन घाबरला.
 
13 इरावण : ऐकावे ते नवलच. युद्धासाठी अर्जुनाच्या मुलाची बळी दिली गेली. मरण्याच्या आधी इरावणाची इच्छा लग्न करण्याची होती. पण ह्या लग्नासाठी कोणतीही मुलगी तयार होत नसे. त्यामागील कारण असे की लग्नानंतर लगेच त्या मुलीचा नवरा म्हणजे इरावण मरण पावणार होता. अश्या परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाने मोहिनी रूप घेऊन त्याच्याशी लग्न केले आणि तो मरण पावल्यावर एका बायकोसारखं निरोप देताना भावविभोर देखील झाले. हाच इरावण आज जगभरातील किन्नरांचे इष्टदेव आहे.
 
14 एकलव्य : प्रत्येकाने एकलव्याचे नाव ऐकलेच असणारं. आपल्या विस्तारवादी विचारसरणीमुळे एकलव्य जरासंधाच्या सैन्यात सामील झाला. जरासंधाच्या सैन्याच्या वतीने त्यांनी मथुरेवर आक्रमण करून यादव सैन्याचा नायनाट करण्यास सुरुवात केलीच होती. असे विष्णू पुराण आणि हरिवंश पुराणांत आढळते. असे म्हणतात की महाभारताच्या युद्धाच्या आधीच श्रीकृष्णाने एकलव्याला वीरगती मिळवून दिली होती नाही तर त्याने युद्धात थैमान घेतले असते. त्याचा मृत्यूच्या नंतर त्याचा मुलगा केतूमान सिंहासनावर आरूढ होतो आणि कौरव सैन्याच्या वतीने पांडवांशी युद्ध करतो. युद्धामध्ये तो भीमाच्या हातून मरण पावतो.
 
15 शकुनी : गांधारचा मुलगा शकुनी हा देखील माया करण्यात सक्षम असे. त्याचे फासे त्यांच्या सांगण्यावरून चालत असे. युद्धाचा वेळी शकुनीने मायेचाा वापर करून श्रीकृष्ण आणि अर्जुनाला भुरळ पाडली. शकुनीच्या मायेच्या प्रभावामुळे सहस्र हिंसक प्राणी अर्जुनाच्या दिशेने धावू लागले. अनेक शस्त्रं सर्व दिशेने येऊ लागली. आकाशातून लोकं आणि दगड पडू लागायचे. या मायाच्या जाळात अर्जुन काही काळ सापडतात पण आपल्या दिव्यास्त्रांचा वापर करून या मायेचे नायनाट करतात. 
 
ह्यांचा व्यतिरिक्त  भूरिश्रवा, सात्यकी, युयुत्सू, नरकासुराचा मुलगा भगदत्त आणि अजूनही काही वीर योद्धा असे. अश्या प्रकारे आपण बघितले की महाभारतात अनेक प्रकाराच्या माया आणि भुरळ असे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या रामायणातील सुषेण वैद्य कोण होते...