अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥ दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥ बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥ कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥ रचना - संत ज्ञानेश्वर संगती...