विष्णूंनी जेव्हा सृष्टी रचना हेतू ब्रह्मांना जन्म दिला तेव्हाच त्यांनी आवळ्याच्या वृक्षाला देखील जन्म दिला. आवळ्याला प्रभू विष्णूंनी आदि वृक्ष या रूपात प्रतिष्ठित केले आहे. यांच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान मानले गेले आहे. आवळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त आहे.
प्रभू विष्णूंनी म्हटले की जो प्राणी स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीची कामना ठेवत असेल त्यांच्यासाठी फाल्गुन शुक्ल पक्षात पुष्य नक्षत्रात येणारं एकादशी व्रत अत्यंत श्रेष्ठ आहे. फाल्गुन मासच्या शुक्ल पक्षात येणार्या या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. आमलकी अर्थात आवळा.
जाणून घ्या या दिवशी कसे करावे पूजन-
* आमलकी एकादशी व्रतच्या एका दिवसापूर्वी अर्थात दशमीच्या रात्री व्रत करणार्यांनी प्रभू विष्णूंचा ध्यान करत झोपावे आणि आमलकी एकादशीला सकाळी स्नान करून प्रभू विष्णूंच्या प्रतिमेसमोर हातात तीळ, कुश, मुद्रा आणि पाणी घेऊन संकल्प करावे की मी विष्णूंची प्रसन्नता आणि मोक्षाची कामाना करत आमलकी एकादशी व्रत करत आहेत. माझे हे व्रत यशस्वीरीत्या पार पडावे या हेतू श्रीहरी मला आपल्या आश्रयात ठेवा.
* तत्पश्चात निम्न मंत्राने संकल्प घेऊन षोडशोपचार रित्या देवाची पूजा करावी.
मंत्र- 'मम कायिकवाचिकमानसिक सांसर्गिकपातकोपपातकदुरित क्षयपूर्वक श्रुतिस्मृतिपुराणोक्त फल प्राप्तयै श्री परमेश्वरप्रीति कामनायै आमलकी एकादशी व्रतमहं करिष्ये'
* देवाची पूजा केल्यानंतर पूजन सामुग्री घेऊन आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. सर्वात आधी झाडाच्या चारी बाजू स्वच्छ करून गायीच्या शेणाचे ती जागा स्वच्छ करावी.
* झाडाच्या मुळात एक वेदी तयार करून त्यावर कळश स्थापित करावे. या कळशात देवता, तीर्थ आणि सागर यांना आमंत्रित करावे.
* कळशात सुगंधी आणि पंच रत्न ठेवावे. त्यावर पंच पल्लव ठेवावे आणि दिवा लावावा. कळशावर श्रीखंड चंदनाचे लेप करावे आणि वस्त्र परिधान करवावे।
* शेवटी कळशावर श्री विष्णूंच्या सहाव्या अवतार परशुराम यांची स्वर्ण मूर्ती स्थापित करावी आणि विधिवत रूपाने परशुरामांची पूजा करावी.
* रात्री भगवत कथा व भजन-कीर्तन करत प्रभूचे स्मरण करावे.
* द्वादशीला सकाळी ब्राह्मणांना भोजन करवून दक्षिणा द्यावी सोबतच परशुरामांच्या मूर्तीसह कळश्या ब्राह्मणाला भेट द्यावे. या नंतर पारायण करून अन्न जल ग्रहण करावे.