Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Amalaki Ekadashi 2021 आमलकी एकादशीला विधीपूर्वक करा पूजा, पूर्ण होईल इच्छा

Amalaki Ekadashi 2021 आमलकी एकादशीला विधीपूर्वक करा पूजा, पूर्ण होईल इच्छा
, सोमवार, 22 मार्च 2021 (17:06 IST)
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी साजरी केली जाते. यंदा आमलकी एकादशी 25 मार्च 2021, गुरुवारी येत आहे. या दिवशी प्रभू विष्णूंची विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सोबतच व्रत करणार्‍यांना मोक्ष प्राप्ती होते. आमलकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णुंची पूजा केल्याचे विशेष महत्त्व आहे. 
 
एकादशीला कशा प्रकारे पूजा करावी जाणून घ्या-
 
आमलकी एकादशी पूजा विधी-
 
1. आमलकी एकादशी व्रत करण्याच्या एका दिवसापूर्वी अर्थात दशमी तिथीला प्रभू विष्णुंचे ध्यान करत झोपावे.
2. यानंतर आमलकी एकादशीला सकाळी स्नान करुन प्रभू विष्णुंच्या प्रतिमासमक्ष हातात तीळ, कुश, मुद्रा आणि पाणी घेऊन व्रत संकल्प करावे.
3. संकल्प दरम्यान व्रत करणार्‍यांनी मी भगवान विष्णुंची प्रसन्नता आणि मोक्षाची कामना करत आमलकी एकादशी व्रत करत आहे. माझे हे व्रत यशस्वीरीत्या पूर्ण व्हावे यासाठी श्रीहरी यांनी मला आपल्या शरणी घ्यावे असे म्हणावे.
4. यानंतर खालील दिलेल्या मंत्राने संकल्प घेत षोड्षोपचार सह देवाची पूजा करावी.
 
मम कायिकवाचिकमानसिक सांसर्गिकपातकोपपातकदुरित क्षयपूर्वक 
श्रुतिस्मृतिपुराणोक्त फल प्राप्तयै श्री परमेश्वरप्रीति
कामनायै आमलकी एकादशी व्रतमहं करिष्ये
 
5. आता भगवान विष्णुंची पूजा झाल्यावर पूजन सामुग्री घेऊन आवळ्याच्या झाडाची पूजा करावी.
6. सर्वात आधी आवळ्याच्या झाडाच्या चारी बाजूची जमीन स्वच्छ करावी. आता झाडाच्या मूळाशी वेदी तयार करुन त्यावर कळश स्थापित करावे.
7. या कळशात देवता, तीर्थ व सागर यांना आमंत्रित करावे. कळशात सुगंधी आणि पंच रत्न ठेवावे. यावर पंच पल्लव ठेवून दीप प्रजवल्लित करावे.
8. कळशावर श्रीखंड चंदनाचे लेप आणि वस्त्र अर्पित करावे. शेवटी कळशावर श्री विष्णुंच्या सहाव्या अवतार परशुरामाची स्वर्ण मूर्ती स्थापित करावी आणि विधीपूर्वक परशुरामाची पूजा करावी.
9. आमलकी एकादशीला रात्री भगवत कथा व भजन-कीर्तन करत प्रभुंचे स्मरण करावे.
10. द्वादशीला सकाळी ब्राह्मण भोज करवावे आणि दक्षिणा द्यावी आणि परशुरामाची मूर्तीसह कळश ब्राह्मणाला भेट म्हणून द्यावे.
11. नंतर व्रतचे पारायण करुन अन्न पाणी ग्रहण करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Holi 2021 हर्बल रंग तयार करण्याची सोपी विधी