Angarak Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात.
गणेश पूजा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे. हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीची पूजा करण्याच शुभ मुहूर्त दुपारी 02:43 ते 03:39 मिनिटापर्यंत आहे. या व्यतिरिक्त दोन अजून शुभ मुहूर्त आहेत. पहिला संधिप्रकाश मुहूर्त 25 जून रोजी संध्याकाळी 07:21 ते 07:42 पर्यंत आहे. यानंतर रात्री उशिरा 12:04 ते 12:44 पर्यंत निशिता मुहूर्त सुरू होईल.
चंद्रोदय वेळ: रात्री 10.05 मिनिटे
अंगारकी चतुर्थी पूजा विधी
अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानजींचेही स्मरण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात. पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. उपवास धरुन गणेशाची पूजा करावी. पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी. गणपतीला उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे आणि फुले अर्पण करावीत. संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे. या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे. असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता आहे.
गणपतीला नैवेद्यात दाखवा हे पदार्थ
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून गणेशजींना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे. या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. याने गणपती प्रसन्न होऊन मनोइच्छित फळ प्रदान करतात आणि सुख- सौभाग्याचा आशीर्वाद देतात. मोदकाव्यतिरिक्त आपण लाडू, नारळाची वडी, खिरापत देखील अर्पित करु शकता. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा.