Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...म्हणून माघी सप्तमीला खाऊ नये मीठ

avoid salt on Rath Saptami
मीठ अत्यंत आवश्यक तत्त्व आहे आणि वर्षभर आम्ही मीठ घातलेले पदार्थ खात असतो परंतू एक दिवस असा देखील आहे ज्या दिवशी मिठाचा त्याग करावा. तो दिवस आहे माघ मासच्या शुक्ल पक्षातील सप्तमीचा. सप्तमी तिथीला मीठ का खाऊ नये हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला निश्चितच असेल.. तर चला जाणून घ्या या बद्दल माहिती...
 
का खास आहे सप्तमी
शास्त्रांप्रमाणे सूर्य देवाने संपूर्ण जगताला प्रकाश दिला म्हणून माघी सप्तमी सूर्य जयंती रूपात देखील साजरा केली जाते. या सप्तमीला पुराणांमध्ये अचला सप्तमी, भानु सप्तमीला अर्क, रथ आणि पुत्र सप्तमी देखील म्हटले आहे. 
 
ही सप्तमी वर्षभरातील सप्तमींमधून श्रेष्ठ मानली गेली आहे. या दिवशी उपास केल्याने सौभाग्य प्राप्ती होते. या दिवशी पूर्वी दिशेकडे तोंड करून सूर्योदयाची लालिमा पसरत असेल अशावेळी अंघोळ करावी. तसेच या दिवशी पवित्र नदीत स्नान करायला मिळाले तर अती उत्तम मानले जाते. या दिवशी स्नानानंतर अर्घ्यदान केल्याने आयू, आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती होते.
 
रथ सप्तमीला जी व्यक्ती पूजा करून गोड भोजन किंवा फलाहार करतात त्यांना पूर्ण वर्ष सूर्य पूजा केल्याचा लाभ प्राप्त होतो. तसेच या दिवशी मीठ सेवन करणे वर्जित मानले गेले आहे. अळणी व्रत केल्याने व्रताचे फळ अनेकपटीने वाढतं असे सांगितले गेले आहे.

हे व्रत सौभाग्य, रूप व संतान सुख प्रदान करणारे आहे. या दिवशी सूर्याला दीप दान देण्याचे देखील महत्त्व आहे. या दिवशी घराच्या मुख्य दारासमोर सात रंगाची रांगोळी काढून त्यावर चारमुखी दिवा प्रज्वलित करावे. नंतर सूर्य देवाला लाल रंगाचे फुलं आणि गोड नैवेद्य दाखवून गायत्री मंत्र किंवा सूर्य बीज मंत्र जपावे. या दिवशी गरिबांना दान करावे. आणि सूर्य देवाला आरोग्य व संताना उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवासमोर दिवा लावण्याचे 9 नियम