suvichar
✕

Shani Jayanti 2026 शनैश्चर जयंतीला या पदार्थांचे सेवन मुळीच करू नये

वेबदुनिया धर्म टीम
शुक्रवार, 15 मे 2026 (12:20 IST)
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार शनि जयंती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली जाते. या वर्षी 16 मे 2026 रोजी शनि जयंती साजरी केली जाणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला खूप शक्तिशाली ग्रह मानले गेले आहे. यासोबतच त्यांना नवग्रहांमध्ये न्यायाधीश म्हटले जाते, जे व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात.
 
 
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि प्रबळ असतो, त्याला जीवनात सुख-समृद्धी मिळते. तर दुसरीकडे शनिदेवाच्या वाईट नजरेमुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते. शनि जयंतीच्या दिवशी व्यक्तीने पूजेसोबत काही खबरदारी घ्यावी. चला जाणून घेऊया शनि जयंतीच्या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये.
 
शनैश्चर जयंतीच्या दिवशी या गोष्टींचे सेवन करू नका
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा प्रभाव सर्वाधिक असतो असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी दुधाचे सेवन करू नये. याचे कारण म्हणजे दूध हे शुक्राशी संबंधित आहे जो इच्छांचा कारक आहे आणि शनिदेव अध्यात्माशी संबंधित आहे. त्यामुळे दुधाचे सेवन टाळावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
 
ज्योतिषी सांगतात की शनिदेव उग्र स्वभावाचे आहेत, त्यामुळे शनिदेव जयंतीला चुकूनही तिखट पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी लाल तिखट खाऊ नये नाहीतर आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच व्यक्तीला शनिदेवाच्या कोपाचा सामना करावा लागू शकतो.
 
शनि जयंतीच्या दिवशी व्यक्तीने चुकूनही मांसाहार, मसालेदार अन्न व मद्य आदींचे सेवन करू नये. हे सर्व राक्षसी वृत्तीचे अन्न असून त्याचे सेवन केल्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच शनि जयंतीच्या दिवशी या गोष्टींचे सेवन करून शनिदेवाची पूजा केल्याने त्यांना राग येऊ शकतो आणि व्यक्तीच्या कुंडलीत शनि दोषाची भीती वाढू शकते.
 
शनि जयंतीच्या दिवशी मसूर डाळ खाणे टाळावे. कारण मसूर डाळीचा रंग लाल असून त्याचा संबंध मंगळाशी आहे. याचा उपभोग केल्याने माणूस उग्र स्वभावाचा बनवतो. अशा वेळी शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी चुकूनही मसूर डाळ खाऊ नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

Diwali Padwa 2026 Wishes for Father in Marathi वडिलांसाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

पुणे-मुंबईपासून दोन दिवसांत फिरून या; दिवाळीच्या छोट्या सहलींसाठी ७ ठिकाणे

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

दिवाळीत ५,००० रुपयांच्या आत फिरता येईल का? महाराष्ट्रातील बजेट ट्रिपचे पर्याय

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments