Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जानवे घालण्याचे 9 फायदे

जानवे घालण्याचे 9 फायदे
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ओळखलं जातं. याला उपनयन संस्कार असेही म्हणतात. सोळा संस्कारामधील हा महत्त्वपूर्ण संस्कार आहे. उपनयन म्हणजे गुरु किंवा ज्ञानच्या जवळ जाणे.
जानवे धारण केल्यावर ब्रह्मचर्याचे पालन करून शिक्षा प्राप्तीकडे लक्ष द्यावे लागत असून त्याचे नियम पाळणे आवश्यक असतं. येथे आम्ही आपल्याला जानवे घालण्याचे काही फायदे सांगत आहोत:
 
जिवाणूंपासून संरक्षण
नियमाप्रमाणे जानवे धारण केल्यावर मल-मूत्र त्याग करताना जी व्यक्ती आपलं तोंड बंद ठेवतात त्यांना ती सवय पडते आणि त्याचं जिवाणूंपासून संरक्षण होतं.
 
मूत्रपिंड संरक्षण
नियमाप्रमाणे पाणी उभे राहून पिऊ नये. या प्रकारेच बसून मूत्र विसर्जन करायला हवे. हे नियम पालन केल्याने किडनीवर जोर पडत नाही.
 
हृदय रोग व ब्लड प्रेशरहून बचाव
शोधाप्रमाणे जानवे धारण करणार्‍यांना हृदय रोग आणि ब्लडप्रेशर की भीती इतर लोकांच्या तुलनेत कमी असते. जानवे शरीरात रक्त प्रवाह नियंत्रित करण्यात मदत करतं. चिकित्सकांप्रमाणे जानवे हृद्याजवळून धारण केलेलं असतं म्हणून हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
 
पक्षाघातापासून बचाव
जानवे धारण करणार्‍या व्यक्तीची मरण पक्षाघातामुळे होण्याची शक्यता कमी असते. कारण नियमाप्रमाणे लघुशंका करताना दातावर दात बसवणे आवश्यक आहे.
 
बद्धकोष्ठतेपासून बचाव
जानवे कानावरून ताठ गुंडाळण्याचा नियम आहे. असे केल्याने थेट आतड्यांशी संबंध असलेल्या कानाजवळीक नसांवर दबाव पडतो. यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार होन नाही. पोट स्वच्छ असल्यास शरीर, मन दोन्ही स्वस्थ राहतात.
 
शुक्राणूंचे संरक्षण
डाव्या कानाजवळून जात असलेल्या नसांचा थेट संबंध अंडकोष आणि गुप्तेद्रीयांशी असतो. मूत्र त्याग करताना जानवे कानावर गुंडाळल्याने त्या नसां दबतात ज्याने वीर्य निघतं. अशात नकळतच शुक्राणूंचे संरक्षण होतं. याने व्यक्तीचे बल आणि तेज याच्यात वृद्धी होते.
 
स्मरण शक्ती संरक्षण
कानावर जानवे ठेवल्याने स्मरण शक्ती क्षय होत नाही. याने स्मृती कोश वाढतं. कानावर दबाव पडल्याने त्या नसा सक्रिय होतात ज्यांचा संबंध स्मरण शक्तीशी असतं. तसेच चूक केल्यावर मुलांचे कान धरण्याचे हे देखील कारण आहे.
 
आचरण शुद्धता
खांद्यावर जानवे आहे हे जाणीव व्यक्तीला चुकीचे काम करण्यापासून थांबवते. पवित्रतेची जाणीव झाल्यावर आचरण शुद्ध होऊ लागतं. आचरण शुद्ध असल्यास मानसिक बल वाढतं.
 
वाईट आत्म्यांपासून रक्षा
जानवे धारण करणार्‍या व्यक्तीजवळ वाईट आत्मा फिरत नाही अशी समजूत आहे. कारण जानवे धारण करणारा स्वत: पवित्र आत्मरूप बनतो आणि स्वत:च अध्यात्मिक ऊर्जेचा विकास होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे