Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुद्राक्ष धारण केल्यानंतर घ्यावयाची काळजी

Care to be taken after wearing Rudraksha
, मंगळवार, 1 मार्च 2022 (11:52 IST)
रुद्राक्ष धारण करतानाच किंवा धारण केल्यानंतरही माणसाला अनेक खबरदारी घ्यावी लागते. 
 
रुद्राक्ष धारण करून अंत्ययात्रेत किंवा स्मशानभूमीत जाऊ नये.
 
याशिवाय ज्या खोलीत मूल जन्माला येते त्या खोलीत रुद्राक्ष धारण करू नये.
 
याशिवाय अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की व्यक्तीने झोपताना रुद्राक्ष धारण करु नये. अनेक लोक यामागचे कारण सांगतात की झोपताना शरीर सुस्त राहते, तर काही लोकांचे असे मत आहे की झोपताना रुद्राक्ष तुटण्याची भीती असते, त्यामुळे ते काढून टाकणे योग्य आहे. आपल्या हवे असल्यास रुद्राक्ष काढून झोपताना उशीखाली ठेवावं. असे केल्याने वाईट स्वप्नेही येत नाहीत.
 
याशिवाय समागम करताना आणि स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी रुद्राक्ष काढून ठेवावं. असे मानले जाते की या दोन्ही वेळी शरीर अपवित्र असतं.
 
याशिवाय रुद्राक्ष धारण करून तामसिक अन्न आणि मादक पदार्थांचे सेवन करू नये. जर तुम्ही रुद्राक्ष धारण करत असाल तर एकतर असे अन्न व मादक पदार्थ घेणे टाळावे किंवा ते घेताना रुद्राक्ष काढून टाकावे.
 
रुद्राक्ष धारण करण्याची संपूर्ण पद्धत:
रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी आणि रुद्राक्ष धारण केल्यानंतरही खूप सावधगिरी बाळगावी लागते. अशा परिस्थितीत रुद्राक्ष धारण करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे श्रावण महिना आहे. या शिवाय कोणत्याही सोमवारी रुद्राक्ष धारण करता येतो. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शिवरात्री किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशीही रुद्राक्ष धारण करू शकता. पितृ पक्षात रूद्राक्ष धारण करु नये. याशिवाय रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस मोहरीच्या तेलात टाकून ठेवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जय शिव शंकर, साम्भ सदाशीव