शनी श्याम वर्ण आहे आणि त्यांना काळा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे शनीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. तसेच अंघोळ करताना पाण्यात काळे तीळ घातल्याने आणि या दिवशी काळे तीळ दान केल्याने देखील लाभ प्राप्ती होते.
अनेक लोक शनिवारी प्रवास करत नाही पण आवश्यक असल्यास पूर्व दिशेकडे सोडून इतर कोणत्याही दिशेत प्रवास करायला हरकत नाही.
विद्वानांप्रमाणे शनिवारी 5 मंत्र जपल्याने शनी प्रसन्न होतात-
शनि बीज मंत्र- ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:
विनियोग मंत्र- शन्नो देवीति मंत्रस्य सिन्धुद्वीप ऋषि: गायत्री छंद:, आपो देवता, शनि प्रीत्यर्थे जपे विनियोग
शनि गायत्री मंत्र- औम कृष्णांगाय विद्य्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात
शनि वेद मंत्र- औम प्रां प्रीं प्रौं स: भूर्भुव: स्व: औम शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु
पीतये शंय्योरभिस्त्रवन्तु न:.औम स्व: भुव: भू: प्रौं प्रीं प्रां ॐ शनिश्चराय नम:
जप मंत्र- ऊं प्राँ प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम:
या 5 मंत्राचा जप करणे शक्य नसल्या केवळ ऊं शनिदेवाय नम: मंत्र जपावे. याने शनी संबधी सर्व समस्या नाहीश्या होता. या मंत्राची केवळ एक माळ जपावी.