हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव आणि शक्तीचा विवाह सोहळा असतो. शिवरात्रीच्या नंतर लगेच अवस येते.
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षाची तिथी अवसेची तिथी असते. आख्यायिका अशी आहे की या तिथीचे आराध्य देव पितृदेव आहे. ते प्रसन्न झाले तर सर्व आत्मा तृप्त होतात.
ज्योतिषींच्या मतेनुसार या दिवशी सूर्य आणि चंद्रमा एकाच राशीत येतात. या दिवशी कृष्ण पक्षात दैत्य आणि शुक्ल पक्षात देव सक्रिय असतात. अवसेच्या तिथीला पितरांना प्रसन्न करावे अशी समज आहे.
या अवसेला पितरांना तर्पण दिले जाते. या तिथीला पितरांच्या मोक्षाची तिथी म्हटली जाते. असे म्हणतात की ज्यांना पितरांना तर्पण करता येत नाही त्यासाठी काही अवस सांगितल्या आहे ज्याला तर्पण करून मोक्ष देऊ शकतो. त्या श्राद्धतिथी म्हणून म्हटल्या जातात. महाशिवरात्रीच्या नंतरची अवस त्यापैकी एक आहे.
या दिवशी श्राद्ध कर्मच नाही तर काळसर्पदोषाचे निवारण पण केले जाते. श्राध्दपक्षात ज्या दिवशी ज्या तिथीला व्यक्ती दिवंगत होते त्याच दिवशी त्याचे कार्य केले जाते. पण कधी कधी तिथी माहित नसल्यामुळे या अवसेला तिथी मानून त्याचे कार्य करता येते. काही ठिकाणी या दिवशी जत्रा भरते. या दिवशी गंगेत स्नान करणे देखील लाभदायी मानले गेले आहे.