Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देवपूजा करताना आपणही करत तर नाही अशी चूक

देवपूजा करताना आपणही करत तर नाही अशी चूक
1- दिवा कधीही सरळ जमिनीवर ठेवू नये. दिव्याखाली किंवा दिव्याच्या ताटाखाली अक्षता ठेवाव्या. दिवा लाकडाच्या चौरंगावर ठेवणे अधिक योग्य ठरेल.
 
2- पूजेत सुपारी जमिनीवर न ठेवता शिक्क्यावर ठेवावी.
 
3- शालिग्राम देखील स्वच्छ रेशीम कपड्यावर ठेवावं.
 
4- पूजेत एखादं रत्न ठेवण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा.
 
5- देवी-देवतांच्या मुरत्या कधीही फरशीवर ठेवू नये. लाकूड किंवा सोनं-चांदीच्या सिंहासन किंवा लाकडाच्या चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी.
 
6- देवी-देवतांचे वस्त्र आणि दागिने जमिनीवर ठेवू नये.
 
7- देवांना अर्पित करण्यापूर्वी जानवे देखील स्वच्छ कपड्यावर ठेवावं.
 
8- शंख लाकडाच्या पाटावर किंवा स्वच्छ कपड्यावर ठेवावं.
 
9- फुलं देखील जमिनीवर ठेवू नये. फुलं ठेवण्यासाठी पवित्र धातूचं पात्र वापरावं.
 
10-पाण्याचा तांब्यादेखील जमिनीवर न ठेवता ताटात ठेवावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुंदर जोडप्याला पिश्शाच रूप का घ्यावं लागलं