Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येच्या दिवशी या चुका अजिबात करू नका

Mauni Amavasya 2025
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (08:30 IST)
पौष महिन्यात येणाऱ्या मौनी अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे. मौनी अमावस्येला पौष अमावस्या असे ही म्हणतात. 
 
मौनी अमावस्येच्या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र  बुध मिळून त्रिवेणी योग तयार करत आहे. सूर्य आणि चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहेत, ज्यामुळे या काळात सूर्य आणि चंद्राशी संबंधित सकारात्मक शक्ती अधिक मजबूत होतात. त्यामुळे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे महत्त्व आहे. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्धही केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने या चुका करणे टाळावे. 

शास्त्रात या दिवशी दान-पुण्य करण्याचं अत्यंत महत्त्व सांगण्यात आले आहे. एक मान्यतेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाल्याचं देखील मानलं जातं ज्यामुळे हा दिवस मौनी अमावस्या या रूपात साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये वर्णित आहे की या महिन्यात पूजन-अर्चना व नदी स्नान केल्याने प्रभू नारायणाची प्राप्ती होते आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने स्वर्ग प्राप्तीचा मार्ग देखील मोकळा होतो. 
घरी स्नान करून अनुष्ठान करू इच्छित असणार्‍यांनी अंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिसळून तीर्थांचे आव्हान करत स्नान करावे. या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं.
मौनी अमावस्येच्या दिवशी या गोष्टी करू नका
मौनी अमावस्येच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी मांस, मासे आणि अल्कोहोलपासून अंतर ठेवा. 
आपल्या पूर्वजांची नाराजी टाळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपल्या पूर्वजांना वाईट बोलू नका. 
मौनी अमावस्येच्या दिवशी कुत्रे, गाय आणि कावळे यांना त्रास देऊ नये.
अमावस्येच्या दिवशी पिंडदान, तर्पण आणि पितरांसाठी दान करणे चुकूनही विसरू नका. अन्यथा तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादापासून वंचित राहाल. 
मौनी अमावस्येच्या दिवशी घराभोवती घाण पसरवू नका. या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. 
ALSO READ: मौनी अमावस्येच्या दिवशी व्रत कथा अवश्य ऐका, पुण्य लाभेल
मौनी अमावस्येच्या दिवशी हे करावे 
मौनी अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नधान्य, कपडे, तांदूळ आणि तीळ दान करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतील. 
अमावस्येच्या दिवशी गंगा नदी किंवा इतर पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करावे. तुम्हाला देवी-देवतांसह पितरांचा आशीर्वाद मिळेल.
मौनी अमावस्येच्या दिवशी गाई, कुत्रे, कावळे इत्यादींना अन्नदान करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. 
अमावस्येच्या दिवशी घराबाहेर दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा. ही दिशा पूर्वजांची मानली जाते. 
अमावस्येच्या दिवशी नदीजवळ, घराबाहेर, पितरांच्या तसबिरीजवळ आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून पितर प्रसन्न होतात. 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरती बुधवारची