Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवसानुसार रोज हे सोपे उपाय केल्याने तुम्हाला ग्रहांचे शुभ परिणाम मिळतील

Do these simple measures daily according to the day
, सोमवार, 20 डिसेंबर 2021 (23:48 IST)
डोक्यावर टिळक लावणे ही हिंदू परंपरांपैकी एक आहे. प्राचीन काळी टिळक लावणे अनिवार्य मानले जाते. टिळक न लावता केली जाणारी पूजाही वैध नव्हती, पण बदलत्या काळानुसार ही परंपराही बदलली आहे. आता लोक खास प्रसंगी टिळकही लावतात.
 
जो व्यक्ती रोज टिळक लावतो, त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते. ज्योतिषशास्त्रानुसार तिलक लावल्याने ग्रहांशी संबंधित अशुभ परिणामही कमी होऊ शकतात. याशिवाय दररोज विशिष्ट गोष्टींचे तिलक लावल्यास शुभ फल मिळण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आठवड्यातील कोणत्या दिवशी तिळक लावावे, ज्यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे...
1.सोमवार 
धार्मिक ग्रंथानुसार सोमवार हा भगवान शिवाचा दिवस मानला जातो. या दिवसाचा अधिपती ग्रह चंद्र आहे, त्यामुळे या दिवशी शुभ्र चंदन, विभूती 
किंवा भस्माचा तिलक लावावा. असे केल्याने भोलेनाथ सोबतच चंद्राची कृपाही आपल्यावर राहते. यासोबतच चंद्राशी संबंधित शुभ परिणामही प्राप्त होतात.
2. मंगळवार 
मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो आणि या दिवसाचा अधिपती ग्रह मंगळ आहे. या दिवशी लाल चंदन किंवा चमेलीच्या तेलात विरघळलेल्या 
सिंदूराचा तिलक लावण्याची परंपरा आहे. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. 
3. बुधवार 
श्रीगणेशाच्या पूजेचा नियम असून या दिवसाचा ग्रह स्वामी बुध आहे. या दिवशी कोरड्या सिंदूराचा तिलक लावावा. असे केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि 
बुध ग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी हा उपाय अवश्य करावा कारण बुध ग्रहाच्या प्रभावामुळेच व्यवसायात यश 
मिळते.
4. गुरुवार
भगवान विष्णूची पूजा केली जाते  आणि गुरु ग्रह या दिवसाचा स्वामी आहे. या दिवशी दगडावर पांढरे चंदन घासून त्यात कुंकू घालून तिळक 
लावल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहते. 
5. शुक्रवार 
शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवसाचा ग्रह स्वामी शुक्र आहे. या दिवशी लाल चंदनाचा तिलक लावावा. असे केल्याने धन आणि लाभाचे 
योग निर्माण होतात तसेच भौतिक सुखाचीही प्राप्ती होते.
6. शनिवार 
शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते  . या दिवसाचा ग्रह स्वामी शनि आहे. या दिवशी काळी हळद दगडावर घासून तिलक लावावा. याने 
शनिदेवाची कृपा राहते आणि दुःखाचा अंत होतो.
 7. रविवार
रविवार सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवसाचा ग्रह स्वामी सूर्य आहे, जो ग्रहांचा राजा देखील आहे. या दिवशी लाल चंदनाचा किंवा रोळीचा तिलक लावावा. 
असे केल्याने मान-सन्मान वाढतो आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sankashti Chaturthi 2021 जाणून घ्या या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी शुभ काळ आणि चंद्रोदयाची वेळ