Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरूड पुराण काय असतं, मृत्यूनंतर याचे वाचन का?

Garuda Purana
, शुक्रवार, 29 मे 2020 (07:19 IST)
गरूड देवांबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक असणारच. हे भगवान विष्णूंचे वाहन आहे. भगवान गरूडांना विनायक, गरुत्मत्, तार्क्ष्य, वैनतेय, नागान्तक, विष्णुरथ, खगेश्वर, सुपर्ण और पन्नगाशन या नावाने देखील ओळखले जाते. गरूडाला हिंदू धर्मातच नव्हे तर बौद्धधर्मात देखील महत्त्वाचे पक्षी मानले गेले आहे. बौद्धधर्मात गरूडाला चांगल्या पंखाचे (सुपर्ण) मानले गेले आहे. 
 
जातक कथांमध्ये गरूडाच्या अनेक कथा आहेत. गरूड नावाचे व्रत देखील आहे. गरूड नावाने पुराण देखील आहे.
 
काय आहे गरूड पुराणात :  एकदा  गरूडाने भगवान विष्णूंकडे माणसांची मृत्यू, यमलोकाचा प्रवास, नरक योनी, आणि सद्गतीच्या संदर्भात अनेक विचित्र आणि गूढ प्रश्न विचारले. भगवान विष्णूंनी त्याचा प्रश्नाचे सविस्तर उत्तरे दिली. याच प्रश्न आणि उत्तरेने गरूड पुराण बनले आहेत. 
 
गरूड पुराणात व्यक्तीच्या कर्मांच्या आधारावर दंड स्वरुप मिळणार्‍या विविध नरकांबद्दल सांगितले गेले आहे. गरूड पुराणानुसार व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी त्याला सद्गतीकडे नेते हे भगवान विष्णूंनी सांगितले आहे.  
 
गरूड पुराणात आपल्या जीवनाबद्दलच्या बऱ्याच सखोल आणि गुपित गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यांची माहिती सर्वांना असायला हवी. आपल्या आत्मज्ञानाचे विवेचन करणे हाच गरूड पुराणाचा मुख्य उद्देश्य आहे. 
 
गरूड पुराणात एकोणीस हजार श्लोक सांगितले आहे. पण सध्याच्या काळात फक्त सात हजार श्लोकच आहेत. गरुडपुराणात ज्ञान, धर्म, धोरण, रहस्य, व्यावहारिक जीवन, आत्मा, स्वर्ग, नरक आणि इतर लोकांचे वर्णन केले आहे. 
 
यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार, निःस्वार्थ भावनेने केलेल्या कर्माच्या महिमा सोबतच यज्ञ, देणगी, तप, तीर्थ सारख्या शुभ कार्यासाठी सर्व सामान्या लोकांना प्रवृत्त करण्यासाठी लौकिक आणि पारलौकिक फळांचे वर्णन केले आहे. या व्यतिरिक्त यामध्ये आयुर्वेद नीतिसार, या विषयांसह मृत जीवांच्या शेवटी केलेल्या कृत्यांचा तपशील वर्णन केलेला आहे. 
 
मृत्यूनंतर पठण का करावं : 
गरूड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहेत. हिंदुधर्मानुसार जेव्हा एखाद्याचा घरात कोणी मृत्यूला पावतो तेव्हा 13 दिवसापर्यंत गरूड पुराणाचे पठण केलं जातं. शास्त्रानुसार एखादा आत्मा लगेचच दुसरा जन्म घेतं. कोणाला 3 दिवस लागतात तर कोणाला 10 ते 13 दिवस लागतात. तर कोणा कोणाला सव्वा महिना लागतो. परंतु ज्यांची स्मृती मृत झाली असल्यास, मोह असल्यास किंवा अकाळी मृत्यू झाली असल्यास त्याला जन्म घ्यायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. तिसऱ्या वर्षी गया येथे त्याचे शेवटचे तर्पण केले जाते. 
 
13 दिवस पर्यंत मृत व्यक्ती आपल्या लोकांमध्येच राहतो. या वेळी गरूड पुराण पठण केल्याने स्वर्ग, नरक, मोक्ष, सद्गती, अधोगती, दुर्गती, सर्व प्रकारच्या गतींबद्दल जाणून घेतो. पुढील प्रवासात त्याला कोण कोणत्या गोष्टीच्या सामोरी जावे लागणार किंवा कुठल्या लोकात त्याचे प्रवास कसे होतील हे सर्व गरूड पुराणात ऐकून कळतं. 
 
मृत्यू नंतर गरूड पुराणाचे पठण होतात. त्या बहाण्याने नाते वाइकांना कळतं की वाईट काय आणि माणसाला सद्गती कोणते कार्य केल्यामुळे मिळते. जेणे करून मृत व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय दोघांना हे कळतं की उच्च लोकात प्रवास करण्यासाठी कोणते चांगले कर्म करायला हवं. गरूड पुराण आपल्याला चांगली कर्म करण्यासाठी प्रेरित करतं. सत्कर्मातूनच सद्गती आणि मोक्ष प्राप्ती होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाभारत कथा : अंबा, अंबिका, अंबालिका कोण होत्या...