गोस्वामी तुलसीदास हिंदी, भारतीय आणि जागतिक साहित्यातील महान कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल तर अनेक लोकांना माहित असेल पण त्यांची इतर रचनांबद्दल कमी लोकांना महित असतं. चला तर जाणून घेऊ या गोस्वामी तुलसीदासांच्या काही रचनांबद्दल:-
तुलसीदास रामचरितमानस
16 व्या शतकात लिहलेली रामचरितमानस हे अवधी भाषेतील रामायणावर आधारित महाकाव्य आहे. ही गोस्वामी तुलसीदास यांची सर्वात प्रसिद्ध रचना म्हणून ओळखली जाते. ह्याची रचना अवधी भाषेत केली गेली होती. हे केवळ वाल्मिकी रामायणाचा अवधीमध्ये अनुवाद नसून रचना, धार्मिक महत्त्व, काव्यशैली आणि इतर घटकांबद्दल माहिती आहेत. त्यांना प्रभू श्री रामांच्या आयुष्याच्या प्रसंगांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची होती आणि तेव्हा संस्कृत सगळ्या लोकांना कळत नसे त्यामुळे त्यांनी ह्याला अवधीमध्ये लिहिले ज्याने लोकांपर्यंत पोहचणे सोपे झाले.
हनुमान चालीसा
ही रचना अवधी भाषेत केलेली आहे ज्यामध्ये हनुमानाचे चाळीस श्लोक आहेत. ही रचना तुलसीदास यांनी लिहिलेले असल्याचे लोकप्रिय मत आहे आणि त्यात त्यांची स्वाक्षरी आहे, पण काही लोकांना असं वाटत की हा कार्य रचना त्यांची नाही. हा भारतातील सर्वात जास्त वाचला जाणारा लहान धार्मिक ग्रंथ आहे आणि लाखो हिंदू मंगळवार आणि शनिवारी ह्याचे पठण करतात.
तुलसी दोहावली
दोहावली गोस्वामी तुलसीदासांची एक साहित्य कृती आहे. ह्याच्यात 573 दोहे आहेत ज्या अवधी आणि ब्रज भाषेत आहे. ह्या दोहांमध्ये राजकीय चतुरता, धार्मिकता आणि जीवनाचा उद्देश, ह्यांच्याबद्दल उल्लेख आहे. ह्यात असलेले दोहे रामचरितमानस, रामज्ञ प्रश्न, वैराग्य सांदीपनी आणि राम सत्साई मध्ये देखील भेटतात.
कृष्णगीतावली
कृष्णगीतावली श्री कृष्णबद्दल असलेली साहित्य रचना आहे. ह्याच्यात 61 गाण्यांचा संग्रह आहे जे श्री कृष्णाला समर्पित आहे. हे ब्रज भाषेत लिहिले आहे. ह्याच्यामधून 32 गीत कृष्णा बाललीला आणि रासलीला यावर आहे तर 27 गीत कृष्ण आणि उद्धव यांच्या संवादाबद्दल आणि दोन द्रौपदीच्या चीरहरण या प्रसंगाचे आहे.
पार्वती मंगल
ह्याच्यात पार्वतीचे प्रायश्चित्त आणि शिव-पार्वती यांच्या विवाहचे वर्णन करणारे 164 श्लोक आहे. हा देखील अवधी भाषेत लिहिला आहे.
रामलला नहछू
रामलला नहछू बाल रामांच्या प्रसंगाबद्दल लिहिलेले आहे. ही एक अवधी रचना आहे ज्याच्यात 20 श्लोकांचा समावेश आहे. नहछू समारंभात हिंदू संस्कार जसे मुंडन, समावर्तन, उपनयन, लग्न ह्यां संस्कारापूर्वी केले जाणारे कार्य जसे पायाची नखे कापणे ह्यांच्याबद्दल लिहिले आहेत.
वैराग्य सांदिपनी
वैराग्य सांदिपनी 60 श्लोकांचे साहित्य रचना आहे ज्याच्यात तात्विक ज्ञान दिलं गेलं आहे. ज्ञान (साक्षात्कार), वैराग्य, संतांचे स्वरूप आणि महानता आणि नैतिक आचरण ह्यांचा वर्णन ह्याच्यात केलं गेलं आहे. ह्याच्यात 46 दोहे, 2 सोरठ आणि 12 चौपई आहे.
ह्याशिवाय बरवै रामायण, जानकी मंगल, रामाज्ञा प्रश्न, संकटमोचन हनुमानाष्टक, हनुमान बाहुक, तुलसी सतसई, विनयपत्रिका, गीतावली हे देखील त्यांच्या साहित्य रचनेतील भाग आहेत.