Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरु पुष्य योग : हे उपाय करा, धन संबंधी समस्या दूर होतील

Guru Pushya Yoga 2021
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (14:35 IST)
गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. पूजेत 'ॐ श्री ह्रीं श्रीं दारिद्रय‍ विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देहि देहि नम:' मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धन प्राप्तीचे योग बनतात.
 
गुरु पुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक मांडावे आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाने प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे केल्याने अडकलेले धन परत मिळतं.
 
कार्यस्थळ जसे दुकान किंवा व्यापार क्षेत्रात पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित करुन धन व ऐश्वर्याची प्राप्ती होते. असे केल्याने व्यवसायात वृद्धी येते आणि आर्थिक संकटं दूर होतात. 
 
नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीत यश मिळविण्यासाठी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करावी. पारद लक्ष्मीसह आपण एकाक्षी नारळाची पूजा करु शकता. एकाक्षी नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरुप मानले गेले आहे. या नाराळाची विधीपूर्वक पूजा करुन धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवल्याने घरात किंवा व्यवसायात कधीच पैशांची कमी भासत नाही.
 
गुरु पुष्य योग असेल त्यादिवशी लक्ष्मी देवीचं चमत्कारिक कनकधारा स्त्रोत आणि लक्ष्मी स्त्रोत पाठ करावा. कनकधारा स्त्रोताचे रचियता आदि शंकराचार्य आहे. हे स्त्रोत पाठ केल्याने धनाचा वर्षाव होता. नियमित पाठ केल्याने वैभव व ऐश्वर्य प्राप्ती होते आणि शत्रूंपासून मुक्ती मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भीष्म द्वादशी कथा Bhishma Dwadashi Story