Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बजरंगबलीच्या या 1 चौपाईमध्ये नशीब पालटण्याचे सामर्थ्य, पाठ करुन घ्या

Hanuman Chaupai for good luck
, मंगळवार, 30 जून 2020 (06:47 IST)
हिंदू धर्मात सर्वात जागृत आणि सर्व सामर्थ्यवान देवांपैकी एक मारुतीची कृपादृष्टी ज्याच्यावर पडायला सुरु होते त्याला कोणीही डाम्बवु शकतं नाही दाही दिशांमध्ये आणि चारही युगात त्यांचा प्रताप आहे. 
 
म्हणून म्हटलं आहे - 
'चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा।'
जे कोणीही त्यांचाशी जुळेल समजा की त्याचे सर्व संकट संपले. 
 
दररोज हनुमान चालीसा पठण करावं. 
दर मंगळवारी उपवास केल्याने आणि दररोज हनुमानाचे पाठ, मंत्र जप, हनुमान चालीसा आणि बजरंग पाठचे पठण केल्याने त्वरित फळ मिळतं.
मारुती या कलियुगात सर्वात जास्त जागृत आणि साक्षात आहे. कलीयुगात मारुतीची भक्तीच लोकांना दुःख आणि संकटापासून वाचवू शकते. बरेचशे लोकं कोणत्या न कोणत्या बाबा, गुरु, किंवा इतर देव - देवी, ज्योतिषी आणि त्रांत्रिकांच्या फेऱ्यांमध्ये भटकत राहतात, कारण ते मारुतीच्या भक्ती आणि शक्तीला ओळखत नसतात. अश्या भटक्या लोकांचे रक्षण रामच करतील.
 
मारुतीची भक्ती आणि हनुमान चालीसा पठण केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.  हीच आहे ती चौपाई ज्यामध्ये आपले नशीब बदलण्याचे पूर्ण सामर्थ्य आहेत. सतत आपण ह्याचा जप करावा की हे मारुती, आपण आमचे रक्षक आहात तर आम्हाला भीती कशाची ?
 
'सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना।'
अर्थ- जे कोणी आपल्याला शरणागत होतात, त्याना सर्व प्रकाराचे सुख भोगायला मिळतात आणि जेव्हा आपण आमचे संरक्षक आहात, तर मग कोणाची भीती का बाळगायची?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ashadhi Ekadashi 2020 : उपवास करण्यापूर्वी नक्की वाचा