Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

mehandi chuda
, शनिवार, 1 मार्च 2025 (19:00 IST)
अनेकांकडे ग्रहमख  विवाहाच्या आदल्या दिवशी करतात तर काही ठिकाणी लग्नाच्या पाच दिवस अगोदर देखील करतात म्हणजेच विवाहाच्या दिवशी ग्रहमख केलेल्या नंतर पाचवा  दिवस येतो. तसेच अनेक ठिकाणी ग्रहमख याला ग्रहयज्ञ देखील म्हणतात. हे ग्रहयज्ञ यजुर्वेदी आणि ऋग्वेदी पद्धतीने देखील केले जाते.
ALSO READ: केळवण आणि ग्रहमख
तसेच ग्रहमख झाल्यावर वर आणि वधू पक्षाकडे मेंदी लावण्याचा कार्यक्रम केला जातो. आजच्या काळात पुरुष देखील या कार्यक्रमात सहभागी होतात. मेंदी लावणारे प्रोफेशनल लोक बोलवले जातात. घरातील संपूर्ण व-हाडातील स्त्रियांना मेंदी काढतात. यामध्ये नवऱ्यामुलीची मेंदी ख़ास असते.
 
मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोटयापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते.तसेच हल्ली बाजारात देखील रेडिमेड मेहंदीचे कोन उपलब्ध झाले असून अनेकजण ती मेहंदी लावणे पसंत करतात. 
मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. तसेच काही ठिकाणी म्हणजेच यजुर्वेदी पद्धतीत नवरीमुलीला ग्रहमखच्या दिवशी सकाळी औक्षण करून सुवासिनी चुडा भारतात. अनेक ठिकाणी ग्रहयज्ञ झाल्यानंतर मेहंदी काढली जाते. आता आशावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की, चुडा भरलेला असताना मेहंदी कशी काढावी?

तर यावर उपाय म्हणून एक एक हिरवी बांगडी चुड्यामधील हातात ठेऊन मेहंदी नक्कीच काढू शकतात. तसेच काही ठिकाणी कासार बाईला बोलावून चुडा भरला जातो. चूड़ा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगडया, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. नवरीला हिरवा चूड़ा भरतात.
ALSO READ: साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या
त्यामध्ये एका हातात 9 तर एका हातात 8 बांगड्या भरल्या जातात. हा हिरवा चूड़ा प्लेन असतो. वधू आणि वराची आईला देखील हिरव्या बांगड्या भरल्या जातात तसेच घरातील सर्व सवाष्णीणींना देखील बांगड्या भरल्या जातात. या वेळी घरात नाच गाणे तर होतेच त्याबरोबर जेवण दिले जाते. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भगवान कल्की - भगवान विष्णूचा भावी अवतार