हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो. मंगळसूत्र हे लग्नाचे आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते. मंगळसूत्राचा महिमा प्राचीन काळापासून सांगितला जातो. ही हिंदू सनातन धर्माची परंपरा आहे जी आजही पाळली जाते. कारण प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी हे खूप महत्वाचे आहे.
महिलांसाठी मंगळसूत्राचे महत्त्व
विवाह सोहळा
मंगळसूत्र हा हिंदू विवाह विधीचा प्रमुख भाग मानला जातो. लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते, या विधीशिवाय विवाह अपूर्ण राहतो. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मंगळसूत्राचे महत्त्व सप्तसदीपेक्षा जास्त मानले जाते आणि या परंपरा किंवा विधीशिवाय लग्न होणे अशक्य आहे.
मंगळसूत्र कसे बनवायचे
मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर स्त्रियां हे धारण करतात. मंगळसूत्र हे पतीबद्दलचे प्रेम आणि आदराचे लक्षण आहे. पतीवरील सर्व संकटे दूर करण्यासाठी हे महत्वाचे असते. मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन. 2 वाट्या म्हणजे पती-पत्नी, तसेच 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. काळ्या रंगाचे मोती वाईट नजरेपासून संरक्षण करतात.
मंगळसूत्रामधील काळे मणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ
मंगलसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे. शिव-शक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो. दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या पर्वांगीतील आदन- प्रदानाचे द्योत आहे.
माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मग गळ्यात घातले जाते. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणं असल्याने विवाहित स्त्रिया धारण करतात. हे मंगळसूत्र पतीच्या निधनानंतरच काढतात, त्यास हे समर्पण करतात. किंवा पतीपासून विभक्त झाल्या वर. आपसातले संबंध तुटल्यावर काढतात.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळसूत्राचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याला बृहस्पतिचा कारक मानला जातो. गुरु हा ग्रह वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानला जातो. शनीला काळे मोती मानले जाते. शनीला स्थिरतेचे प्रतिक मानले जाते. अशा प्रकारे मंगळसूत्रामुळे शनि ग्रहाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात स्थिरता आणण्याची शक्ती येते असे सांगितले जाते.