Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे फायदे

Webdunia
गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (14:42 IST)
कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असे ही म्हणतात. पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्यानं आणि प्रयाग मध्ये कुंभ स्नानाच्या वेळी गंगेच्या स्नानाचे मिळतं तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्यानं मिळतं. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते. 
 
पद्म पुराणानुसार जी व्यक्ती संपूर्ण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात स्नान करते आणि भगवान विष्णू यांची पूजा करते, भगवान श्री विष्णूची कृपा त्याला मिळते. पद्म पुराणानुसार जी व्यक्ती कार्तिक महिन्यात नियमानं सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून धूप दीप लावून भगवान विष्णूंची पूजा करते ती भगवान विष्णूंना प्रिय असते. 
 
पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याने सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले आहेत. 
 
एका कथेनुसार एकदा कार्तिक महिन्याची महत्ता जाणून घेण्यासाठी कुमार कार्तिकेयाने भगवान शिवाला विचारले की कार्तिक महिन्याला सर्वात पुण्यदायी महिना का म्हणतात ? या वर शंकराने उत्तर दिले की ज्या प्रमाणे नदी मध्ये गंगा श्रेष्ठ, देवांमध्ये श्री हरी विष्णूच श्रेष्ठ त्याच प्रमाणे महिन्यात हा कार्तिक महिना श्रेष्ठ आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू पाण्यात निवास करतात. म्हणून या महिन्यात नदीत किंवा तलावात स्नान करून विष्णू भगवानांची पूजा करण्याचा आणि प्रत्यक्षात साक्षात्कार करण्याचे पुण्य प्राप्त होते.
 
जेव्हा भगवान विष्णूने श्रीकृष्ण रूपात अवतार घेतले तेव्हा रुक्मिणी आणि सत्यभामा त्यांच्या राण्या झाल्या. सत्यभामाच्या विषयी सांगितले जाते की त्या पूर्वीच्या जन्मी एका ब्राह्मणाची कन्या होत्या. तारुण्य वयात एके दिवशी त्यांच्या पती आणि पित्याला एका राक्षसाने ठार मारले. बऱ्याच दिवस या ब्राह्मण कन्या रडत बसल्या नंतर यांनी स्वतःला कृष्णाच्या भक्तीत अर्पण केलं. त्या सर्व एकादशीचा उपवास करत होत्या आणि कार्तिकच्या महिन्यात नियमितपणे सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा करत असे.

एके दिवशी म्हातारपणात या ब्राह्मण कन्येने कार्तिक स्नानासाठी गंगेत गेल्यावर थंडीचे दिवस असल्याने आणि त्या थंडीने ताप भरून कापत होत्या अश्याच अवस्थेत त्यांनी गंगेच्या काठी आपले प्राण सोडले. त्याच वेळी विष्णू लोकांतून एक विमान आले आणि या ब्राह्मण कन्येच्या दिव्य शरीरास वैकुंठात म्हणजे विष्णुलोकात नेले. 
 
जेव्हा भगवानाने कृष्ण अवतार घेतले तेव्हा या ब्राह्मण कन्येने सत्यभामाच्या रूपात जन्म घेतले. कार्तिक महिन्यात दीपदान करून सत्यभामाला सुख आणि ऐश्वर्य प्राप्त झाले. नियमितपणे तुळशीला पाणी दिल्यानं बागेचा आनंद मिळाला. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात केलेल्या दानाचे फळ माणसाला पुढील जन्मात मिळतात.
 
कार्तिक महिन्यात स्नान आणि दानाचे महत्त्व -
हा महिना धार्मिक कार्यांसाठी उत्तम मानला गेला आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं श्रेष्ठ मानले आहे. भाविक लोक गंगेत आणि यमुनेत दररोज सकाळी स्नान करतात. जे लोक सकाळी नदी मध्ये स्नान करू शकत नाही ते सकाळी आपल्या घरात स्नान करून पूजा करतात. 
 
कार्तिक महिन्यात शिव, चंडी, सूर्य आणि इतर देवांच्या देऊळात दिवे लावायचे आणि उजेड करण्याचे महत्त्व आहे. या महिन्यात भगवान श्री विष्णूचे फुलांनी अभिवादन केले पाहिजे. 
असं केल्यानं अश्वमेघ यज्ञच्या सम पुण्य फळ मिळतं. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला माणसांनी स्नान न करता राहू नये. 
 
कार्तिक महिन्यातील षष्ठीला कार्तिकेय उपवासाचे अनुष्ठान केले जाते. स्वामी कार्तिकेय याचे आराध्य आहे. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान द्यावं. हे दान एखाद्या गरजूला द्यावं. कार्तिक महिन्यात पुष्कर, कुरुक्षेत्र आणि वाराणसी तीर्थक्षेत्रांना स्नान आणि दानासाठी अती महत्त्वाचे मानले आहे. 
 
कार्तिक स्नान पूजा -
सकाळी अंघोळ केल्यावर राधा-कृष्णाची पूजा तुळस, पिंपळ आणि आवळ्यांनी करावी. सर्व देवांची प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व आहे. संध्याकाळी भगवान श्री विष्णू आणि तुळशीची पूजा करावी. दीपदान करावं.
 
अशी आख्यायिका आहे की कार्तिक महिन्यात सूर्य आणि चंद्रमाच्या किरणांचे प्रभाव माणसांवर अनुकूल पडतात. या किरण माणसाच्या मनाला आणि मेंदूला सकारात्मक ऊर्जा देतात. कार्तिक महिन्यात राधा-कृष्ण, विष्णू भगवान आणि तुळशीच्या पूजेचे फार महत्त्व आहे. जो कोणी या महिन्यात ह्यांची पूजा करत, त्याला पुण्य फळाची प्राप्ती होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

Chath Aarti छठ मातेची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments