Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

षट्तिला एकादशी : या 6 प्रकारे वापरावे तीळ

Shattila Ekadashi Vrat 2021
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:42 IST)
पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी तीळ वापरण्याचे महत्त्व आहे. हे एकादशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी ‍तिळाच्या तेलाने मालीश करावी आणि तिळाचे उटणे लावून पाण्यात तिळ घालून अंघोळ करावी. नंतर सूर्यादेवाची पूजा करावी.
 
या दिवशी वैदिक ब्राह्मणांना तांब्याच्या कळशात तीळ भरुन वर गूळ ठेवून दान देण्याचे महत्त्व आहे. सोबतच सवाष्णींना श्रृंगार सामुग्री द्यावी. तसेच या 6 प्रकारे तीळ वापरणे श्रेष्ठ ठरेल.
 
1. तीळ स्नान
 
2. तिळाचे उटणे
 
3. तिलोदक
 
4. तिळाचे हवन
 
5. तिळाचे भोजन
 
6. तिळाचे दान
 
या उपवासात तिळाचे खूप महत्त्व आहे. याने दुर्भाग्य, दारिद्रय व अनेक कष्टांपासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी लाल गायीला गूळ व घास खाऊ घालण्याचेही महत्त्व आहे. गायीला गूळ- घास खाऊ घातल्यावर पाणी पाजावे. असे केल्याने पितृ आमच्यावर प्रसन्न होतात. जीवन सुखाने भरतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागा साधूंचे वेगळे जग, स्वत:चं करतात पिंडदान