Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण असून दोघेही विष्णूचे अवतार होते

महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण असून दोघेही विष्णूचे अवतार होते
महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण होते आणि दोघेही विष्णूचे अवतार होते. ऐकण्यात ही बाब थोडी विचित्र वाटते पण बिलकुल खरी आहे. महाभारतातील पहिल्या कृष्णाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे ज्याने प्रत्येक वेळेस पांडवांचा साथ दिला होता आणि अर्जुनचे सारथी बनून कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याला विजय मिळवून दिली. पण दुसर्‍या कृष्णाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहोत  …
 
1. महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारताची रचना केली, त्यांचे मूळ नाव श्रीकृष्ण द्वैपायन व्यास होते. त्यांची आई सत्यवती आणि पिता महर्षी पराशर होते.
 
2. श्रीमद्भागवतामध्ये विष्णूच्या ज्या 24 अवतारांचे वर्णन करण्यात आले आहे, त्यात महर्षी वेदव्यास यांचे देखील नाव आहे.
 
3. जन्म घेतल्याबरोबच महर्षी वेदव्यास युवा झाले आणि तपस्या करण्यासाठी द्वैपायन द्वीप गेले. तपस्या केल्यामुळे ते काळे झाले होते.   म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणून लागले. वेदांचा विभाग केल्याने ते वेदव्यास नावाने प्रसिद्ध झाले.
 
4. महर्षी वेदव्यास यांच्या कृपेमुळे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांचा जन्म झाला होता.
 
5. धर्म ग्रंथांमध्ये जे अष्ट चिरंजीवी (8 अमर लोक ) सांगण्यात आले आहे, महर्षी वेदव्यास देखील त्यातूनच एक आहे. म्हणून त्यांना आज देखील जीवित मानले जाते.
 
6. महर्षी वेदव्यास यांनी जेव्हा कलयुगचा वाढलेला प्रभाव बघितला तर त्यांनीच पांडवांना स्वर्गाची यात्रा करण्यास सांगितले होते.
 
7. महर्षी वेदव्यास यांनीच संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती, ज्याने संजयाने धृतराष्ट्राला संपूर्ण युद्धाचे वर्णन महालात सांगितले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भविष्यातील संकटांची सूचना देतात स्वप्न