Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र

Webdunia
जीवनात यश मिळविण्यासाठी गणपतीची आराधना केली जाते. कुटुंबात सुख-शांती, समृद्धी, यश, उत्तम आरोग्यासाठी गणपतीचे मयूरेश स्तोत्र सिद्ध व लगेच फल देणारे सिद्ध होतात. राजा इंद्राने मयूरेश स्तोत्राने गणपतीला प्रसन्न करून विघ्नांवर विजय प्राप्त केली होती. चतुर्थीच्या दिवशी याचा पाठ केल्याने फल सहस्र पटाने वाढून जातं.
 
विधी:
 
* सर्वात आधी शुद्ध होऊन स्वच्छ वस्त्र धारण करावे
* काही विशेष इच्छा असल्यास लाल वस्त्र आणि लाल चंदन वापरावे
* पूजा केवळ मनाच्या शांती किंवा अपत्याच्या प्रगतीसाठी असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे. पांढरे चंदन वापरावे
* पूर्वीकडे तोंड करून आसन ग्रहण करावे
* ॐ गं गणपतये नम: म्हणत गणपतीची प्रतिमा स्थापित करावी
 
निम्न मंत्राद्वारे गणपतीचे ध्यान करावे
 'खर्वं स्थूलतनुं गजेंन्द्रवदनं लंबोदरं सुंदरं
प्रस्यन्दन्मधुगंधलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्
दंताघातविदारितारिरूधिरै: सिंदूर शोभाकरं
वंदे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम।'
 
गणपतीच्या 12 नावांचे पाठ करावे
 
'सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णक:
लंबोदरश्‍च विकटो विघ्ननाशो विनायक :
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन:
द्वादशैतानि नामानि य: पठेच्छृणयादपि
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमें तथा संग्रामेसंकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते'
 
गणपती आराधना हेतू 16 उपचार मानले गेले आहेत:
1. आवाहन 2. आसन 3. पाद्य (देवाचे स्नान‍ केलेले जल) 4. अर्घ्य 5. आचमनीय 6. स्नान 7. वस्त्र 8. यज्ञोपवीत 9 . गंध 10. पुष्प (दूर्वा) 11. धूप 12. दीप 13. नैवेद्य 14. तांबूल (पान) 15. प्रदक्षिणा 16. पुष्पांजली
 
मयूरेश स्त्रोतम् ब्रह्ममोवाच
- 'पुराण पुरुषं देवं नाना क्रीड़ाकरं मुदाम।
मायाविनं दुर्विभाव्यं मयूरेशं नमाम्यहम् ।।
परात्परं चिदानंद निर्विकारं ह्रदि स्थितम् ।
गुणातीतं गुणमयं मयूरेशं नमाम्यहम्।।
सृजन्तं पालयन्तं च संहरन्तं निजेच्छया।
सर्वविघ्नहरं देवं मयूरेशं नमाम्यहम्।।
नानादैव्या निहन्तारं नानारूपाणि विभ्रतम।
नानायुधधरं भवत्वा मयूरेशं नमाम्यहम्।।
सर्वशक्तिमयं देवं सर्वरूपधरे विभुम्।
सर्वविद्याप्रवक्तारं मयूरेशं नमाम्यहम्।।
पार्वतीनंदनं शम्भोरानन्दपरिवर्धनम्।
भक्तानन्दाकरं नित्यं मयूरेशं नमाम्यहम्।
मुनिध्येयं मुनिनुतं मुनिकामप्रपूरकम।
समष्टिव्यष्टि रूपं त्वां मयूरेशं नमाम्यहम्।।
सर्वज्ञाननिहन्तारं सर्वज्ञानकरं शुचिम्।
सत्यज्ञानमयं सत्यं मयूरेशं नमाम्यहम्।।
अनेककोटिब्रह्मांण्ड नायकं जगदीश्वरम्।
अनंत विभवं विष्णुं मयूरेशं नमाम्यहम्।।
 
मयूरेश उवाच
 
 
इदं ब्रह्मकरं स्तोत्रं सर्व पापप्रनाशनम्।
सर्वकामप्रदं नृणां सर्वोपद्रवनाशनम्।।
कारागृह गतानां च मोचनं दिनसप्तकात्।
आधिव्याधिहरं चैव मुक्तिमुक्तिप्रदं शुभम्।।
 
 
याची काळजी घ्यावी
* गणपतीला पवित्र फूल अर्पित करावे
* शिळे, कोमजलेले, कीटक असलेली फुलं गणपती मुळीच अर्पित करू नये
* गणपतीला तुळस अर्पित करू नये
* गणपतीला दूर्वाने जल चढवणे पाप समजले जाते, असे करणे टाळावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments