शनिवारी येणार्या अमावस्येला शनिश्चरी किंवा शनी अमावस्या म्हणतात. या दिवशी पितरांचे ध्यान आणि तरपण केले जाते. शनीच्या साडेसातीमुळे परेशान असणार्यांनी या दिवशी शनी देवाची उपासना केली पाहिेजे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान केल्याने उत्तम फल प्राप्ती होते. ही अमावस्या कुंभ राशीच्या जातकांसाठी महत्त्वाची आहे कारण या दिवशी शनीची रास कुंभमध्ये चतुर्ग्रही योग बनत आहे. या दिवशी सूर्य, चंद्र, बुध, आणि शुक्र चारी ग्रह एकाच राशीत असतील.
शनीची साडेसाती असणार्यांसाठी या दिवशी खास उपाय सांगितले गेले आहेत-
या दिवशी मोहरीच्या तेलात आपली सावली बघून दान करावे.
काळ्या घोड्याची नाळ आपल्या घराच्या दारावर लावल्याने शनीच्या साडेसातीत लाभ मिळतो.
यादिवशी कुत्र्या पोळी खाऊ घालावी.
संध्याकाळी पश्चिम दिशेकडे तेलाचा दिवा लावून 'ॐ शं शनैश्चराय नम:' मंत्र जपावं आणि प्रदक्षिणा घालावी.