चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते, असे म्हणतात की याने कामात येणारे अडथळे दूर होतात आणि आनंदाची प्राप्ती होते. हिंदू मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि घरात सुख -समृद्धी येते. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे हे जाणून घ्या-
गणेशाला दुर्वा अर्पण करा
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या. असे मानले जाते की गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात. जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करत असाल, तेव्हा हा मंत्र 'इदम दुर्वादलम ओम गणपतये नमः' म्हणावा.
गणपतीसमोर दिवा लावा
संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून गणपतीची पूजा करुन गणेशासमोर दिवा लावावा. दिवा तुपाचा असावा. हे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, गणपतीला अख्खी हळदीचा एक तुकडा अर्पण करावा, ज्यामुळे जीवनातील सर्व त्रास नष्ट होतील.
गणपतीला मोदक अर्पण करा
मोदक गणेशला खूप आवडतात. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवसापासून गणपतीला मोदक अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते.
शमीची पाने गणेशाला अर्पण करा
हिंदू मान्यतेनुसार, शमी ही एकमेव अशी वनस्पती आहे ज्याच्या पूजेने गणेश प्रसन्न होतात, म्हणून पूजा करताना गणेशाला शमीची पाने अर्पण करा. यामुळे तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील.
गणपतीला अक्षता अर्पण करा
गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना अक्षता अर्पण कराव्या पण लक्षात ठेवा की कोरडे तांदूळ गणेशाला अर्पित करु नये. तांदूळ थोडे ओलसर करुन आणि तीन वेळा 'इदम अक्षतम ओम गं गणपतये नमः' या मंत्राचे पठण करताना गणपतीला अक्षता अर्पण करा.
गणपतीला लाल शेंदूर अर्पित करा
गणेशाला शेंदुरी रंग आवडतो, म्हणून गणेशला शेंदुरी तिलक करावं. गणेशजींना सिंदूर अर्पण करताना 'सिंदूरम शोभनम् रक्तम् सौभाग्यम् सुखवर्धनम्' हा मंत्र म्हणावा. शुभम कामदाम चैव सिंदूरम प्रतिघ्यात्तम॥ 'ओम गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा.