Sant Chokhamela Information In Marathi : संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवाच्या संतमेळाव्यातील वारकरी संत होते. यांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला असून ते महार जातीचे होते. हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असे.सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे.
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते.
चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके 1200 साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरीत भरभराट होता.
त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले. पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.दैन्य, दारिद्ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. त्यांना मंदिरात प्रवेश न्हवता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगाच्या भक्तिरसात लीन झाले . संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाज बांधवांना दिला. ध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे 13व्या शतकात उदयास आली.
एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखामेळा आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाले.पंढरपुरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळा बाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले. ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत.अशी त्यांची इच्छा होती.रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले, चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो. आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभा-यात आले. आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले . दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर उभा असलेला पाहत असतो. तुझी आठवण येत नाही, असा क्षण ही जात नाही. नाम्याचा नैवेद्य खाताना, पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते. तुझ्या आठवणीत हे होतं. हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले. ते विठोबाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला मायबापा तूच आहेस.
बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता.त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला.त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले.तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला.त्याने उत्तर दिले की माझी काहीच चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणले आहे.
यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही.हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की, नदी पात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने अंघोळ केली तर नदीचे पाणी बाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का? यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली.
संत चोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता. विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत. त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले.
चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली.
संत चोखोबांचे अभंग -
धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।
आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।
ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा।।
विठ्ठल विठ्ठल गजरी। अवघी दुमदुमली पंढरी।
हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढयाचे होते. त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उध्दाराची सतत काळजी वाटत होती.आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.