Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shree Eknath Shashti 2026 Messages in Marathi श्री एकनाथ षष्ठी निमित्त विनम्र अभिवादन

शांतीचा सागर आणि समतेचा वारसा जपणारे,
संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
नाथषष्ठीच्या निमित्त विनम्र अभिवादन
 
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..."
भूतदयेचा प्रत्यक्ष आदर्श समाजासमोर ठेवणारे
शांतीब्रह्म पैठणनिवासी नाथ महाराजांना विनम्र अभिवादन

अखंड नामस्मरण, रसाळ वाणी आणि जनसामान्यांच्या मनावर
अध्यात्म ठसवणारे संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
 
भक्तीचा मळा फुलवून, 
भारुडांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या
श्री एकनाथ महाराजांच्या विचारांना मानाचा मुजरा
 
विठ्ठल भक्तीचा ध्यास, 
पांडुरंगाचा सहवास,
पैठणच्या गोदातीरी ज्यांचा कायमचा वास...
अशा महान संत एकनाथ महाराजांना एकनाथ षष्ठीनिमित्त त्रिवार वंदन
 
ज्यांनी तहानलेल्या गाढवाला गंगेचे पाणी पाजून साक्षात ईश्वराचे दर्शन घडवले,
त्या परमदयी संत नाथांना एकनाथ षष्ठीनिमीत्त कोटी कोटी प्रणाम
 
एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि अभंगवाणीचा हा अनमोल ठेवा,
आपल्या जीवनात सदैव तेवत राहो
एकनाथ षष्ठीनिमित्त त्रिवार वंदन
 
नाथांच्या घरचा 'काला' आणि भक्तीचा सोहळा...
विठ्ठलाच्या नामाचा गजर अन् आनंदाचा मेळा!
एकनाथ षष्ठीनिमित्त त्रिवार वंदन

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे