Festival Posters

संत नामदेवांचे अभंग

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (08:51 IST)
१.
सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥४॥
२.
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥
३.
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
ह्रदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडजुढी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥
४.
दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं । एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रम्हा होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥३॥
५.
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं म्हणती आम्ही । सांगसी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Hanuman Janmotsav 2026 Wishes in Marathi हनुमान जन्मोत्सव शुभेच्छा

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

आरती गुरुवारची

हनुमान जन्मोत्सव विशेष: जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बजरंगबलीचे 'हे' छोटे उपाय नक्की करून पहा!

Hanuman Janmotsav 2026 दुर्मिळ शुभ योगात हनुमानाचा जन्मोत्सव, पूजेचे मंत्र, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments