अध्याय सहावा - श्लोक १ ते ५० ॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजय जदद्वंद्या वेदसारा ॥ अनंगदहनहृदयविहारा ॥ कमलोद्भवजनका परात्परा । अगोचरा निरुपाधिका ॥१॥ इच्छामात्रें प्रचंड ॥ मायेनें रचिलें ब्रह्मांड ॥ चौऱ्यांशीं लक्ष योनि उदंड ॥ जीव आंत भरियेले ॥२॥ ते जीव विसरूनि तूंतें ॥ भुलले देखोनि विषयांतें ॥ म्हणोनी...