झाले झाले चैत्र गौरी चे आगमन,
घरातील लक्ष्मी प्रसन्न झाली मनोमन,
करा ग आरास, सजवा ग गौर घरी,
खळणे मांडले बाळाचे, अवती भवती सारी,
थंड पन्हे करा,करा डाळ कैरीची,
बोलवा सुवासिनी,ओटी भरा ओल्या हरभऱ्याची,
कुमारिका पण येतील आईसवे ग आपुल्या,
स्वागत तिचेही हळदीकुंकू देऊनी ग करा,
होईल प्रसन्न गौर तुमचे वर,देईल आशिष,
घरातील सान थोर, झुकवा तुम्ही शिष!
...अश्विनी थत्ते.