सृष्टी नटली, सजली हसली, पिवळे वस्त्र ल्याली,
बदलवून रूप आपले, हिंदोळ्यावर स्वार झाली,
अवचित आली झुळूक गार, गेलं भान हरपून,
आला आला वसंत, हेंच दान घेऊन,
पवित्र्याचा रंग पिवळा, कामदेव ही प्रसन्न झाला,
उधळून रंग सोनेरी, पवित्र्याचा साक्षात्कार जाहला,
अचंबीत जाहले नर नारी,
नवं नवं रूप हे बघोनी,
सृष्टी ने दिधली सर्वा, जगण्या जणू नवं संजीवनी !!
....वसंत पंचमी च्या शुभेच्छा !!
...अश्विनी थत्ते