Vinayaka Chaturthi 2023 प्रत्येक हिंदू महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. फाल्गुन महिन्यात येणारी विनायक चतुर्थी यावेळी 23 फेब्रुवारी 2023 रोजी येत आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
पंचांगानुसार विनायक चतुर्थी 23 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू होईल. ते दिवसभर चालेल. या दिवशी उपोषणही केलं जातं. सकाळी 11.26 ते दुपारी 1.43 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. याशिवाय शुभ चोघड्यांमध्येही पूजा करू शकता.
या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर गणेशजींना स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यांना शेंदुर लावावे. लाल फुले, लाल वस्त्र अर्पण करुन अगरबत्ती व देशी तुपाचा दिवा लावावा. यानंतर त्यांना मोदक किंवा लाडू अर्पण करावे.
शास्त्रामध्ये या दिवशी उपवास ठेवण्यास सांगण्यात आले आहेत परंतु जे उपवास ठेवू शकत नाहीत ते फळे खाऊ शकतात. त्यांना हवे असल्यास ते शुद्ध शाकाहारी आणि सात्विक आहार (ज्यात लसूण आणि कांदा नसतात) घेऊ शकतात.