Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पूजा केल्यावर आरती करण्याचे काय महत्त्व? जाणून घ्या

पूजा केल्यावर आरती करण्याचे काय महत्त्व? जाणून घ्या
, गुरूवार, 7 जानेवारी 2021 (09:28 IST)
प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. भगवंत प्रकाश आणि ज्ञानाच्या रूपात सर्वत्र आहे. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे अज्ञान रुपी मानसिक विकार दूर होतात, जीवनाचे दुःख नाहीसे होतात. म्हणून आरतीच्या माध्यमाने प्रकाशाची पूजा ही देवाची उपासना मानली आहे. 
 
आपण सर्व पूजेनंतर देवाची आरती करतो. श्रद्धा भक्तीने केली गेली पूजा आणि त्यानंतर केली जाणारी आरतीमध्ये इतकी शक्ती असते की हे भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करतात. शास्त्र म्हणतात की कोणतीही पूजा अर्चना ही आरती केल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही, म्हणून पूजेच्या दरम्यान आरती करण्याचे विशेष महत्त्व आहे. आरतीला 'निरांजन' देखील म्हटले आहे निरांजनाचा अर्थ आहे विशेष रूपाने प्रकाशित करणे म्हणजे देव पूजने पासून प्राप्त होणारी सकारात्मक शक्ती मनाला उजवळून व्यक्तित्वाला उज्ज्वल बनवते.
 
* शास्त्र काय म्हणतात -
प्रकाश ज्ञानाचे प्रतीक आहे. देव प्रकाश आणि ज्ञान रूपात प्रत्येक जागी आहे. ज्ञान प्राप्त केल्याने अज्ञान रुपी मानसिक विकार दूर होतात, जीवनाचे सर्व कष्ट मिटतात. म्हणून आरतीच्या माध्यमाने प्रकाशाची पूजा परमात्माची पूजा मानले आहे. शास्त्र म्हणतात की अग्नी हीच पृथ्वीवर सूर्याचे बदललेले रूप आहे. असे म्हणतात की अग्नी देवाला साक्षी मानून त्याच्या सह केलेल्या प्रार्थना यशस्वी होतात. स्कन्द पुराणानुसार, परमेश्वर श्री विष्णूने स्वतः सांगितले आहे 'की जी व्यक्ती असंख्य तुपाचे दिवे लावून माझी आरती करते, ती कोटी कल्प पर्यंत स्वर्गलोकात वास्तव्य करते. जी व्यक्ती माझ्या पुढे होणाऱ्या आरतीचे दर्शन करते, ती शेवटी परमपद मोक्ष प्राप्त करते. जी व्यक्ती माझ्यापुढे भक्तीभावाने कापुरारती करते ती माझ्यात म्हणजे अनंतात प्रवेश करते. जरी मंत्राशिवाय आणि क्रियेशिवाय माझी पूजा केली आहे, पण माझी आरती केल्याने ती पूर्ण होते.
 
* आरती अशी करावी -
आरती करणे हे सोपे माध्यम आहे ज्याच्या द्वारे  दैवीय शक्तींना पूजेच्या स्थळी पोहोचण्याचे मार्ग मोकळे होतात. पूजेच्या नंतर आरती नियमाने करतात तर मिळणाऱ्या पूजेच्या फळात वाढ होते. आरती करण्यापूर्वी आरतीचे ताट सुंदर पद्धतीने सजवून घ्यावे. या साठी आपण तांबा, पितळ किंवा चांदीचे ताट घेऊ शकता. नंतर ताटलीत रोली, कुंकू, अक्षता, ताजे फुले आणि प्रसादासाठी काही गोड धोड ठेवावे. माती, चांदी, तांबे किंवा पितळ्याच्या दिव्यात साजूक तुपाचा किंवा कापराचा दिवा आरतीसाठी लावावे. गव्हाच्या पिठाचा दिवा देखील पूजेसाठी शुभ मानले आहे. असे म्हणतात की आरती दिवसातून एक ते पाच वेळा देखील करू शकतो पण साधारणपणे घरात सकाळ आणि संध्याकाळ आरती करतात. वेगवेगळ्या देवांची स्तुती करण्यासाठी वेगवेगळे वाद्ययंत्र वाजवून आरती केल्याने देवी-देव त्वरित प्रसन्न होतात, त्यांच्या वर देवी-देवांची कृपा राहते असे पुराणात म्हटले आहे.
 
* किती वेळा आरती फिरवावी -
 आरती करण्यासाठी दिव्याच्या ताटाला देवाच्या समोर योग्य पद्धतीने फिरवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम देवाच्या पायाकडून चार वेळा फिरवा नंतर नाभीच्या दिशेने दोन वेळा फिरवा आणि तोंडाकडे नेऊन एक वेळा फिरवा. अशा प्रकारे 7 वेळा पेक्षा जास्त आरती करावी आरती केल्यावर दोन्ही हाताने आरती घेण्याचा मागील तथ्य आहे की ईश्वराची शक्ती त्या ज्योती मध्ये समाविष्ट झालेली आहे ज्याला भक्त आपल्या डोक्यावर घेऊन धन्य होतात. आरती केल्यानंतर शंखामधील पाण्याला शिंपडल्याने हे शुभ मानतात. असं केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि पूजा केल्याचे फळ मिळतात.
 
* आरतीमुळे वास्तुदोष दूर होतात-
कोणतीही पूजा किंवा सणाच्या दिवशी तूप, कापूर किंवा तेलाचा दिवा लावून आरती केल्याने वातावरण सुवासिक होतो, ज्यामुळे सभोवतालातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रसरण होतो आणि घरातील सदस्यांना कीर्ती आणि मान मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकर संक्रांती विशेष : कधी आहे मकर संक्रांती, त्याचे महत्त्व जाणून घ्या