Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोत्र म्हणजे काय ? जाणून घेऊ या याचा अर्थ आणि ऋषींची परंपरा...

gotra
, बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (20:32 IST)
पं. हेमन्त रिछारिया
सनातन धर्मात गोत्र खूप महत्त्वाचे आहे. 'गोत्राचे शाब्दिक अर्थ खूप विस्तृत आहे. विद्वानांनी वेळोवेळी याचा योग्य प्रकारे अर्थ लावला आहे. 'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'त्र' म्हणजे 'संरक्षण करणे', म्हणून गोत्राचे एक अर्थ इंद्रिय आघातांपासून संरक्षा देणारे देखील आहे. ह्याचा स्पष्टपणे संकेत ऋषींकडे दर्शविले आहे.
 
सामान्यपणे गोत्राला ऋषी परंपरेने निगडित मानले गेले आहे. ब्राह्मणांसाठी तर 'गोत्र' विशेष महत्त्वाचे आहे कारण ब्राह्मण हे ऋषींची संतती मानले जातात. म्हणून प्रत्येक ब्राह्मणाचे संबंध एका ऋषिकुलाशी असतो.
 
प्राचीनकाळी गोत्र परंपरा चार ऋषींच्या नावाने सुरू झाली असे. हे ऋषी आहे -अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. काही काळानंतर जमदग्नी, अत्री, विश्वामित्र आणि अगस्त्य ही ह्यात समाविष्ट झाले.
 
व्यावहारिक स्वरूपात 'गोत्र' म्हणजे ओळख. जी ब्राह्मणांसाठी त्यांचा ऋषिकुळांनी होते.
 
कालांतराने जेव्हा वर्ण व्यवस्थेने जाती व्यवस्थेचे रूप घेतल्यावरही ओळख स्थान आणि कर्माशी संबंधित झाली. हेच कारण आहे ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त इतर वर्गाचे गोत्र बहुतेक त्यांचा उद्गम स्थान किंवा कर्मक्षेत्राशी निगडित असतात. 'गोत्र' मागील मुख्य भावना एकत्रीकरणाची आहे परंतु सध्याच्या काळात आपसातील प्रेम आणि जिव्हाळाच्या अभावामुळे गोत्राचे महत्त्व हळू-हळू कमी होत आहे. आता हे केवळ औपचारिक कर्मकांडापुरतीच राहिले आहेत.
 
गोत्र माहिती नसल्यास
ब्राह्मणांमध्ये जेव्हा कोणाला आपल्या गोत्राची माहिती नसेल तर तो 'कश्यप' गोत्राचे उच्चार करतो. असे या साठी कारण कश्यप ऋषींचे एकापेक्षा जास्त लग्न झाले असे आणि त्यांना बरीच अपत्ये होती. अनेक अपत्य असल्यामुळे असे ब्राह्मण ज्यांना आपल्या गोत्राची माहिती नसते 'कश्यप' ऋषींच्या ऋषिकुळाशी निगडित मानले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऋषी पंचमी : सप्तऋषि किती आहेत, जाणून घेऊ या जे आपणांस माहीत नसेल..