Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kopa Bhavan रामायणात उल्लेख असलेले कोप भवन कसे दिसत होते?

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2024 (12:40 IST)
रामायणात कोप भवनाचा उल्लेख आल्यावर असे वाटते की ते असे ठिकाण असेल जिथे राण्या जाऊन रागावतील किंवा राग व्यक्त करतील. पण तसे नाही. कोप भवन हे असे ठिकाण होते जिथे एकदा राणी गेली की तिची इच्छा पूर्ण झाल्यावरच ती परत यायची, नाहीतर तिथेच ती आपल्या प्राणाची आहुती देत असे. 
 
कोप भवन म्हणजे 'रागात किंवा दु:खात रडणे'. ही एक इमारत होती ज्यामध्ये राजघराण्यातील नाराज सदस्य आपला राग दाखवत असत. रामायणात जेव्हा त्याचा उल्लेख आहे तेव्हा तिथेही राणी कैकेयीने आपला मुद्दा मांडण्यासाठी कोप भवनची मदत घेतली होती. कोप भवन ही काही सामान्य खोली नव्हती जिथे राण्या नुसत्या एकांतात जायच्या, पण या खोलीचे काही नियम होते. प्राचीन काळी जेव्हा राणी राजावर रागावत असे तेव्हा ती या वास्तूत जाऊन आपला राग दाखवत असे. या वास्तूत जाण्यापूर्वी राणीला तिचे सर्व राजेशाही कपडे आणि दागिने सोडून द्यावे लागत असे. 
 
ती तिचे केस मोकळे सोडत असे, सर्व श्रृंगार सोडून देत असे आणि जोपर्यंत ती त्यात राहत असे तोपर्यंत ती शोकग्रस्त स्थितीत राहत होती. तिला ना खाण्याची इच्छा असायची ना तिला राजेशाही सुख मिळत होते. ती त्या खोलीत स्वत:ला कोंडून घेत असे.
 
कोप भवन हे राजवाड्यांजवळ बांधण्यात आले होते, जिथे सर्वत्र अंधार होता आणि खोल्यांमध्ये चैनीची सोय नव्हती. ती खोली अंधारकोठडीसारखी होती. तेथे राजाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. हा राजवाडा मुख्यतः राजाच्या राण्यांसाठी होता. कोप भवनासारख्या निर्जन ठिकाणी जाऊन राण्या राजाप्रती राग व्यक्त करत असत.
 
राजा न गेल्यास राणी आपले शरीर सोडून जात असत. राणीला एखाद्या गोष्टीचा खूप राग असायचा, किंवा तिची काही इच्छा पूर्ण व्हावी असा हठ्ठ असायचा तरच ती कोप भवनात जात होती. या महालात जेव्हा कधी राणी जात असे, तेव्हा स्वतः राजाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असे कारण राजवाड्यात जाऊन राणीने आपला असंतोष आणि संताप व्यक्त करत असे. 
 
राजाला हे कळल्यावर राणीची समजूत घालण्यासाठी कोपभवनात जाणे बंधनकारक असाचये. कारण जर तो गेला नाही तर राणी तेथेच राहील आणि सुख-सुविधांशिवाय भुकेने आणि तहानेने देह त्यागूनप्राणाची आहुती देत असे. या कारणांमुळे कोप भवनाचा प्रभाव खूप वाढला आणि हेच कारण होते की जेव्हा कैकेयी कोप भवनात गेली तेव्हा राजा दशरथाला तिचे मन वळवावे लागले आणि तिची मागणी मान्य करावी लागली कारण कारण कैकेयी राजा दशरथाला खूप प्रिय होती.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजूत आणि लोकश्रृतीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Brief Biography संत तुकाराम महाराज जीवन परिचय

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

नीम करोली बाबांचे हे १० विचार तुमचे जीवन बदलतील

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments