Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

Mrityu Bhoj Niyam in Garud Puran
, बुधवार, 2 एप्रिल 2025 (06:01 IST)
Mrityu Bhoj Niyam : सनातन धर्मात कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युनंतर आत्म्याच्या शांतीसाठी तेराव्या दिवसाचे भोजन आयोजित करण्याची परंपरा आहे. तेराव्या दिवशी ब्रह्मभोजन करण्याची ही परंपरा अनेक काळापासून चालत आली आहे, जी आता मृत्युभोज म्हणून ओळखली जाते. सनातन धर्मात एकूण १६ संस्कारांचा उल्लेख आहे, त्यापैकी एक म्हणजे अंतिम संस्कार. या विधीच्या १२ व्या दिवशी फक्त ब्राह्मणांना जेवण घालणे आणि त्यांना दान देणे विधी आहे.
 
तथापि गरुड पुराणात कुठेही मृत्युभोजनाचा उल्लेख नाही. परंतु अंत्यसंस्काराच्या १२ व्या दिवशी ब्रह्मभोजन आणि ब्रह्मदान करण्याची तरतूद आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यु भोज पाप आहे कारण त्यानुसार आत्मा तेराव्या दिवसापर्यंत कुटुंबातील सदस्यांमध्ये फिरत राहतो. यानंतरच आत्मा दुसऱ्या जगात जातो. असे म्हटले जाते की तेराव्या दिवशी ब्रह्मभोजन खाल्ल्याने आणि दान केल्याने आत्म्याला पुण्य मिळते आणि त्याला परलोकाची प्राप्ती होते.
 
गरुड पुराणानुसार, "मृत्युभोज फक्त गरीब ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीनेच स्वीकारला पाहिजे. पण जर श्रीमंत व्यक्तीने तो स्वीकारला तर त्याला गरिबांचा हक्क हिसकावून घेण्याच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागेल."
 
गीतेमध्ये मृत्यूभोज बद्दल असे म्हटेल आहे की "मृत्यु भोज खाल्ल्याने व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो, त्याची ऊर्जा संपते."
 
महाभारतात जेव्हा दुर्योधनाने श्रीकृष्णाला अन्न खाण्याची विनंती केली तेव्हा कृष्णाने म्हटले की, "सम्प्रीति भोज्यानि आपदा भोज्यानि वा पुनैः", म्हणजेच जेव्हा अन्न देणाऱ्याचे मन आनंदी असेल आणि खाणाऱ्याचे मन आनंदी असेल, तेव्हाच अन्न खावे.
अस्वीकरण: ही माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lakshmi Panchami 2025: २ एप्रिल रोजी लक्ष्मी पंचमी, या ५ उपायांनी धनाच्या देवीला प्रसन्न करा