Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूजा करावी की नाही जाणून घ्या खास माहिती

Webdunia
गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (10:52 IST)
प्राचीन काळात संध्याकाळची उपासना केली जात होती. नंतर पुढे ती पूजा आरती आणि वेगवेगळ्या पूजेच्या विधीमध्ये बदलून गेली. आपण असे ही म्हणू शकतो की संध्याकाळचा उपासनेचे 5 प्रकार आहेत.
(1) प्रार्थना
(2)ध्यान साधना
(3)भजन कीर्तन
(4)यज्ञ आणि 
(5) पूजा-आरती. 
 
मनुष्य आपल्या श्रद्धेप्रमाणे पूजा करतो. सर्वांना पूजा करण्यापूर्वी शौच आणि आचमन करावं लागतं. आम्ही आपणास पूजेच्या अश्या काही गोष्टी सांगत आहोत ज्याने आपल्या माहितीत भर पडेल. 
 
1 वैदिक काळातील प्रार्थना नामशेष झाली : प्राचीन काळात वैदिक लोक वेदी बांधून एकत्ररीत्या प्रार्थना करत होते. वैदिक ऋषी अरण्यात आपल्या आश्रमात राहून यज्ञ, ध्यान आणि देवोपासना करायचे. याचा पूर्वीपासूनच हिंदू धर्माचे बहुतेक लोक दगडाला देव मानून त्याची पूजा करायचे. दगड त्यांच्यासाठी देवाचा प्रतीक असे. आजतायगत हे सुरूच आहे.
 
2 पूजेचा प्राचीन इतिहास : ऋग्वेदात सोमनाथाचे देऊळ असण्याचा उल्लेख मिळतो. यामुळे हे सिद्ध होते की भारतात देऊळाची परंपरा जुनी आहे. इतिहासकारांचा विश्वास आहे की ऋग्वेदाची निर्मिती 7000 ते 1500 इ पूर्वी म्हणजे आजच्या 9 हजार वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी पासूनच पूजा करण्याची सुरुवात झाली. रामाच्या काळात सीतेेेेने गौरी पुजली, महाभारत काळात रुक्मिणीने गौरी पुजली आणि अर्जुनाकडून युद्धाच्या पूर्वी दुर्गा पूजनाचे केल्याचा पुरावा आहे की त्या काळात देखील देवी-देवांची पूजा करण्याचे महत्त्व होते. देवघर त्यांचा घरापासून वेगळे असायचे. शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा सर्वात जुनी आहे. रामायण काळात भगवान रामाने रामेश्वरम येथे शिवलिंग स्थापित केले. शिवलिंगाला त्या काळी आदिवासी आणि रानटी लोकं पुजायचे. शिवलिंगाच्या पूजेनंतर हळू-हळू नाग आणि यक्षांची पूजा करणे सुरू झाले.
 
3 पूजेत भावना महत्त्वाची : गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझ्या भक्ताला माझे रूप किंवा माझा अंश प्रत्येक वस्तूंमध्ये दिसतो आणि तो त्याला आपल्या मनात माझे नाव घेऊन पुजतो. माझ्याच रूपाची किंवा अवतारांची मूर्ती बनवून पुजतात. ज्यांना या मूर्तींमध्ये माझा रूप किंवा अंश दिसत नाही ते माझ्या शाश्वत आणि असीम रूपांची पूजा करतात. दोन्ही प्रकारचे भक्त भक्तीच्या मार्गावर चालतात आणि माझ्या परम निवासाकडे वाटचाल करतात. हे अर्जुन पूजा म्हणजे मनाची जोपासना आहे आणि मनाच्या साधनेचा विधीशी काय घेणं देणं आहे. ज्या प्रकारे दोन प्रेम करणाऱ्यांचे प्रेम करण्यापूर्वी मन जुळतात. त्याच प्रमाणे भक्ती केली जाते. या पद्धती तर निर्मात्यांनी बनवून दिल्या आहे. मी त्या पद्धतीने केलेली पूजा देखील स्वीकार करतो. पण मी हे काहीच बघत नाही की माझा भक्त कोणत्या पद्धतीने पूजा करत आहे किंवा करत नाही. मी बघतो तर फक्त हेच की पूजा करणाऱ्याच्या मनाचे कसे आहेत. त्यांचा मनात माझ्यासाठी भक्ती, भावना, प्रेम आहे की नाही हे बघतो. ज्या पूजेमध्ये भक्ती भाव आणि माझ्या साठी वात्सल्य नसेल तर अशी पूजा करून मला कोणी प्राप्त करू शकत नाही. मला प्राप्त करायचे असल्यास माझ्या मध्ये मन आणि ध्यान लावावे.
 
4 पूजा म्हणजे ढोंग नसतं : बरेच लोक पूजेला ढोंग मानतात, कारण आजकाल पूजेच्या मनाच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. बरेचशे लोक यज्ञ विधीला देखील ढोंग मानतात, कारण यज्ञ विधी देखील मनाप्रमाणे केले जात नाही. बरेच लोक भजनामध्ये देखील जात नाही, कारण भजनाचे स्वरूप आता बदलले आहेत आता भजनात देवाचे गाणे न म्हणता फिल्मी गाणे म्हणतात. भजन किंवा कीर्तन का करतात याचे महत्त्व देखील माहीत नसतं. प्रार्थना आणि ध्यान आता देऊळात न करता, मोठ्या-मोठ्या आश्रमात किंवा योगा वर्गात करतात.
 
5 नियमानं पूजा करावी : पूजेला नित्यक्रमात सामील केले आहे. पूजा करण्याचे पौरोहित्यांनी बऱ्याच मनाच्या पद्धती विकसित केले आहेत. पूजा देवी किंवा देवाच्या मूर्तीच्या समोरच करतात. यामध्ये गूळ आणि तुपाचा धूर दिला जातो. त्यानंतर हळद, कुंकू, धूप, दीप आणि उदबत्तीने पूजा करून देवांची आरती करतात. पूजेत सर्व देवांची उपासना केली जाते. पूजा-आरती करण्याचे देखील काही नियम आहेत. नियमाने केलेली पूजेचे फायदे मिळतात.
 
6 पूजेची वेळ जाणून घ्या : 12 वाजेच्या पूर्वी पूजा आणि आरती आटपून घ्यावी. दुपारी 12 ते 4 पूजा किंवा आरती करू नये. रात्री सर्व कामे वेदांमध्ये निषिद्ध मानले गेले आहेत. जे रात्रीच्या वेळी यज्ञ आणि पूजा करतात त्यांचे उद्दिष्टे काही वेगळेच असतात. पूजा आणि यज्ञाचे सात्त्विक रूपच मान्य आहेत. 
 
7 पूजा केल्याचे अनेक फायदे आहेत : पूजा केल्यानं वातावरण शुद्ध आणि पवित्र होत आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते. ज्यामुळे मनाला आणि मेंदूला शांती मिळते. पूजा संस्कृतचे मंत्रोत्चाराने करतात. पूजा पूर्ण झाल्यावर आरती करतात. यज्ञ करण्यापूर्वी यज्ञाची पूजा करतात. त्याचे वेगळे नियम असतात. पूजा केल्यानं देव प्रसन्न होतात. पूजा केल्याने रोग आणि दुःख नाहीसे होतात आणि माणसाला मोक्ष मिळत. 
 
8 पूजेचे प्रकार : 1 प्रवेश द्वाराची स्वच्छता करणं, निर्माल्य काढणं, हे सर्व काम प्रवेश किंवा अभिगमनच्या अंतर्गत येतात. 
2 कृतज्ञता गंध, फुले, तुळस, दिवा, वस्त्राभूषण या साऱ्या पूजेचे साहित्य एकत्र करणं उपादान किंवा कृतज्ञता आहे. 
3 योग : इष्ट देवांची आत्मरूपाने पूजा करणं योग आहे. 
4 स्वाध्याय : मंत्रार्थ च्या ज्ञानाचा शोध करत जप करणं, सूक्त-स्रोत पठण करणं, गुण नावाचा कीर्तन करणं हे सर्व स्वाध्याय आहेत. 
5 इज्या : उपचार करून आपल्या आराध्य देवांची पूजा करणं इज्याच्या अंतर्गत येतात.
 
9 पूजेचे प्रकार : 
(1) पाच उपाय,
(2) दहा उपाय,
(3)सोळा उपाय,
 
(1) पाच उपाय: गंध, फुले, धूप, दिवा आणि नैवेद्य. 
(2) दहा उपाय : पद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र निवेदन, गंध, फुले, धूप, दिवा, नैवेद्य, आचमन, तांबूल, स्तवपाठ, तर्पण आणि नमस्कार. पूजेच्या शेवटी सांगता सिद्धी साठी दक्षिणा द्यावी. 
 
10 पंचदेव पूजा : प्रत्येक देवांचे आप-आपले मंत्र असतात. ज्याद्वारे त्यांना आवाहन केले जाते. ज्या देवतेची पूजा किंवा उपासना करावयाची आहे त्यापूर्वी पंचदेवांची पूजा केली जाते. देवांना अंघोळ घातल्यावर पाने, फुले, धूप अर्पण करतात. प्रत्येक गोष्ट अर्पण करताना त्यांचे मंत्र म्हणतात.
आदित्यं गणनाथं च देवी रुद्रं च केशवम्‌
पंच दैवत्यामि त्युक्तं सर्वकर्मसु पूजयेत
अर्थ : सूर्य, गणेश, दुर्गा, शिव, विष्णू- हे पंचदेव म्हणवले जातात. यांची पूजा सर्व शुभ कार्यात करायला पाहिजे.
 
11 आरती : आरतीला आरात्रिक किंवा निरांजन देखील म्हणतात. आराध्य पूजेत काही कमी असल्यास किंवा काही दोष असल्यास त्याची पूर्तता आरती केल्यानं पूर्ण होते. सामान्यतः 5 वातींच्या दिव्याने आरती केली जाते. याला 'पंच प्रदीप' असे ही म्हणतात. या व्यतिरिक्त 1,7 किंवा विषम संख्येचे दिवे लावून देखील आरती करण्याचा नियम आहे. विशेष करून दिव्याची वात पूर्व दिशेस केल्यानं आयुष्यात वाढ, पश्चिमीकडे केल्यानं दुःखात वाढ, दक्षिणी कडे केल्यानं तोटा आणि उत्तरेकडे केल्यानं धनलाभ होतं. वात दिव्याचा मध्यभागी लावल्यानं शुभ फळे मिळतात. तसेच दिवाच्या सर्व बाजूने वात लावणे देखील शुभ असत.
 
12 घरात पूजेसाठी काय-काय साहित्य असावे : 
गृहे लिंगद्वयं नाच्यं गणेशत्रितयं तथा। 
शंखद्वयं तथा सूर्यो नार्च्यो शक्तित्रयं तथा॥
द्वे चक्रे द्वारकायास्तु शालग्राम शिलाद्वयम्‌।
तेषां तु पुजनेनैव उद्वेगं प्राप्नुयाद् गृही॥
 
अर्थ - घरात दोन शिवलिंग, तीन गणपती, दोन शंख, दोन सूर्य, तीन दुर्गाच्या मुर्त्या, दोन गोमतीचक्र आणि दोन शाळिग्राम नसावे. ते असल्यास कुटुंब प्रमुखाला अशांतता मिळते. 
 
एका मूर्तिर्न सम्पूज्या गृहिणा स्केटमिच्छता।
अनेक मुर्ति संपन्नाः सर्वान्‌ कामानवाप्नुयात॥
अर्थ : कल्याणाची इच्छा करणारे मंडळी एक मूर्तीची पूजा करू नये, अनेक देवांची पूजा करावी, या मुळे सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
13 पूजे-आरतीचे साहित्य : उदबत्ती, कापूर, केशर, चंदन, जानवी जोड 5, कुंकू, तांदूळ, अबीर, गुलाल, बुक्का, हळद, दागिने, नाडी, कापूस, रोळी, शेंदूर, सुपारी, विड्याचे किंवा नागलीचे पान, फुलांची माळ, कमळगट्टे, धणे, सप्त मृत्तिका, सप्तधान्य, कुशा आणि दूर्वा, पंचखाद्य, गंगेचं पाणी, मध, साखर, साजूक तूप, दही, दूध, मोसमी फळे, नैवेद्य किंवा मिठाई, वेलची, लवंग, मौली, अत्तर, सिहांसन किंवा पाट किंवा चौरंग, पंच पाने (वडाची, औदुंबराची, पिंपळ, आंबा आणि पाकरांचे पाने), पंचामृत, तुळस, केळीचे पान, औषधी, (जटामांसी,शिलाजीत इत्यादी) पाना किंवा मूर्ती, गणपतीची मूर्ती, अंबिकांची मूर्ती, सर्व देवी देवांसाठी वस्त्र, पाण्याने भरलेला तांब्या (मातीचा किंवा तांब्याच्या), पांढरे कापड (अर्धा मीटर), लाल कापड (अर्धा मीटर), पंचरत्न (सामर्थ्यानुसार), समई, मोठ्या समई साठी तेल, तोरण, तांबूल (लवंग लावलेला विड्याचं पान, नारळ, धान्य (गहू किंवा तांदूळ), फुले लाल गुलाब आणि कमळ, एका नव्या पिशवीत हळकुंड, धणे, आणि दूर्वा इत्यादी अर्घ्य पात्रा सहित इतर सर्व पात्र.
 
14 घरात पूजा करावी किंवा नाही : काही विद्वानांच्या मते घरात पूजेची प्रथा मध्यकाळापासून सुरू झाली आहे. ज्यावेळी हिंदूंना देऊळात जाण्या पासून बंदी होती, आणि त्यांचे अनेक देऊळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. या कारणास्तव बनवलेले देऊळ घराप्रमाणे असायचे ज्यामध्ये कळस किंवा गुम्बद नसायचा. सध्याच्या काळात घरात दररोज पूजा केली जाते आणि देऊळात आरती किंवा पूजा करण्यासाठी दिवस ठरलेले असतात, त्यामध्ये देखील गुरुवारच्या आरतीमध्ये किंवा पूजेत आवर्जून जावं. प्राचीन काळात घरातच नाही, तर घराच्या बाहेर देऊळात किंवा देवघराची वेगवेगळे स्थळ असायची. जेथे सर्व लोकं एकत्र होऊन पूजा, आरती, यज्ञ किंवा कोणत्याही प्रकारचा मांगलिक कार्य करून सण साजरा करायचे. देऊळ हे खाजगी किंवा सार्वजनिक दोन्ही प्रकारचे असतात.
 
घर आणि देऊळाचे वातावरण वेग वेगळे असतात: घरात म्हणजे सांसारिक असतं आणि देऊळ हे आध्यात्मिक असतं. देऊळात अश्या आध्यात्मिक वातावरणात पूजा, आरती, जप केल्यानं विशेष फायदा मिळत. वर्तमानात घरात पूजेच्या पद्धतीमुळे लोकं देऊळात कमीच जातात. म्हणून आठवड्यातून एकदा तरी देऊळाला जाऊन पूजा करावी हे चांगलं राहतं आणि शक्य असल्यास मंगळवार किंवा गुरुवारी करावी. घरात देऊळ न ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे घरात सांसारिक गृहस्थ वातावरण असणं, ही भोगाची विषय वस्तू आहेत आणि देऊळ हे योग आणि संन्यासाचे. आपण आपल्या गृहस्थीला देवघरात ठेवू शकता का ? किंवा आपल्या झोपण्याच्या खोलीला देवघरात ठेवू शकता का? किंवा आपण आपले स्वयंपाकघराला देवघरात ठेवू शकता का ?
 
15 प्राण प्रतिष्ठा : 
शालग्राम शिलायास्तु प्रतिष्ठा नैव विद्यते
अर्थ - शाळिग्रामाची प्राणप्रतिष्ठा होत नाही.
 
शैलीं दारुमयीं हैमीं धात्वाद्याकार संभवाम्‌।
प्रतिष्ठां वै प्रकुर्वीत प्रसादे वा गृहे नृप॥
अर्थ - दगड, लाकूड, सोनं किंवा इतर धातूंच्या मुरत्यांची प्राण-प्रतिष्ठा घरातच किंवा देऊळातच करावी.
 
गृहे चलार्चा विज्ञेया प्रसादे स्थिर संज्ञिका।
इत्येत कथिता मार्गा मुनिभिः कुर्मवादिभिः॥
अर्थ - घरात नेहमी चल प्रतिष्ठा आणि देऊळात नेहमीच अचल प्रतिष्ठा करावी. असे कर्मज्ञानी मुनींचे मत आहेत.
 
गंगेत, शाळिग्राम शिळेत, शिवलिंगात सर्व देवांची पूजा आव्हान-विसर्जन केल्या शिवाय करता येते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

बाबा खाटू श्याम चालीसा

Budh Pradosh Vrat 2024: बुध प्रदोष व्रत आज, महत्व, पूजा विधी आणि उपाय

Tulsi Vivah 2024 तुळशी विवाहाची संपूर्ण विधी

नारायणस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments