Dharma Sangrah

खेळताना रंग बाई होळीचा!

- डॉ.प्रकाश खांडगे

Webdunia
आला शिमग्याचा हा सण । दारी आला ग साजण
संगे गडी गडणी घेऊन न । खेळू म्हणे रंग रंग रंग
शिमग्याची ही लावणी पारंपारिक लावणी कलावंतांकडून अनेकदा ऐकली. या लावणीवरील नृत्य आणि अदाकारी पाहिली. लावणीचे शब्द आणि लावणीची अदाकारी विलोभनीय होती. शिमगा, होळी आणि लावणीचा खूप जवळचा संबंध आहे. कारण होळी, शिमगा म्हणजे रंगांची उधळण. ही रंगांची उधळण लावणीतही दिसते. शब्दांच्या रूपाने. 'खेळताना रंग बाई होळीचा होळीचा। फाटला ग कोना माझ्या चोळीचा ` ही लावणी होळीचे वर्णन करणारी लावणी. लावणीची जे अनेक प्रकार आहेत त्यात हौद्याची लावणी नावाचा प्रकार आहे. बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि पुण्याचे पेशवे यांच्या राजमहालात होळीचे, शिमग्याचे, रंगपंचमीचे रंग खेळण्यासाठी स्वतंत्र हौद असत. या हौदातून रंगांची रेलचेल असे. हे रंग खेळताना सादर होणार्‍या लावण्या म्हणजेच हौद्याच्या लावण्या होत.

छक्कड, जुन्नरी, बालेघाटी, पंढरपुरी बाजाची असे लावणीचे विविध प्रकार असून अनेक लावण्यांमध्ये होळी, शिमग्याचा व रंगांचा उल्लेख हमखास असतो. या सर्व लावण्यांचा मुख्य स्त्रोत संत वाङ्मयात आढळतो. संत वाङ्मयात 'पाच रंगांच्या पाच गौळण ी` आहेत. कृष्णाने गौळणींवर रंग उडविल्याचा उल्लेख संत वाङ्मयात आढळतो. वसंतोत्सवाचे दर्शन घडविणार्‍या या रंगोत्सवाचे खरे सामर्थ्य या रंगोत्सवाच्या उत्स्फूर्ततेत आहे. षृंगार रसाच्या विविध छटांचे दर्षन घडविणार्‍या लावण्यांमध्ये रंगोत्सव आहे. पंढरपूरचे दिवंगत लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांनी होळीच्या अनेक लावण्या रचल्या आहेत. इतकेच नव्हे तर रंगपंचमीच्या दरम्यान पंढरपूरात उत्पात मंडळी लावणी गायनाचा महोत्सव साजरा करीत असतात. आजही ही परंपरा भागवताचार्य वा. ना. उत्पाद यांनी सुरू ठेवली आहे. 'श्रीरंगा सारंगधरा मी लाजून धरते करा, चला निघा माझ्या मंदिरा, उडवा रंग रंग रंग। ही षाहीर पठठ्बापूरावची गौळण प्रसिध्द आहे. शाहीर पठठ्बापूरावच नव्हे तर प्रभाकर, होनाजी बाळ, रामजोशी, अनंत फंदी अशा अनेक शाहिरांनी होळीच्या लावण्या आणि गौळणी रचल्या आहेत. ज्यातून लावणीच्या शब्दकलेतून रंगांचा उत्सव दृग्गोचर होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Vat Purnima 2026 वट पौर्णिमा २०२६: पूजा, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि जाणून घ्या काय करावे-काय टाळावे

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

Muharram 2026: मोहरम का साजरा केला जातो? जाणून घ्या कर्बलाचा इतिहास आणि महत्त्व

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments