रंग आवडणार्यांसाठी होळी हा सण अत्यंत आनंदाचा असतो. रंग खेळणार्यांसाठी पाच दिवस खूप मजा असते कारण महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.
या दिवशी होलीका दहन म्हणजे होळी प्रजलवित करण्यात येते. कोकणात याला शिमगा असेही संबोधले जातं. झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या एकत्र करुन होळी पेटवण्याची परंपरा आहे. याने वातावरणातील हवा शुद्ध होते. यात अनेक औषधी झाडाचं लाकूड जाळण्यामागील कारण म्हणजे या काळात असलेल्या रोगजंतूचा प्रसारामुळे होणार धोका टाळणे देखील आहे. होळी पेटवल्याने कीटकांचा नाश होतो.
होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. सर्व वैर विसरुन सर्वांनी एकत्र येऊन रंग खेळावे अर्थातच एकतेचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.
होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. अनेक ठिकाणी फाल्गुनी पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
होलिका दहन शुभ मुहूर्त
दिनांक: 9 मार्च 2020
संध्याकाळी: 06:22 ते 08:49 मिनिटापर्यंत
भद्रा पुंछ मुहूर्त: सकाळी 09:50 ते 10:51 मिनिटापर्यंत
भद्रा मुख मुहूर्त: सकाळी 10:51 ते 12:32 मिनिटापर्यंत